शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

येवला बाजार समितीत कांदा भावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:58 IST

आवक टिकून : सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव

ठळक मुद्देउन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २५० ते १०५४ रुपये तर सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले.

येवला : येवला कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. कांद्यास देशांतर्गत सर्वसाधारण मागणी राहिली. समितीत सप्ताहात एकूण ४४ हजार ८८९ क्विंटल कांदा आवक झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २५० ते १०५४ रुपये तर सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले. उपबाजार अंदरसूल येथेही कांद्याची एकूण २६ हजार १७२ क्विंटल आवक झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल इतके राहिले.सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हाची एकूण आवक २६ क्विंटल झाली असून, बाजारभाव १११७ ते २२७१ रुपये तर सरासरी १८८५ रुपयांपर्यंत होते. बाजरीची एकूण आवक २३५ क्विंटल झाली असून, बाजारभाव १२२५ ते १६९० रुपये तर सरासरी १३८३ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक १८ क्विंटल झाली असून, बाजारभाव २९०० ते ३८०० रुपये तर सरासरी ३४३४ रुपयांपर्यंत होते. मुगाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात मुगाची एकूण आवक १९८ क्विंटल झाली असून, बाजारभाव ३००० ते ५९२४ रुपये तर सरासरी ५ हजारापर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक ५५१ क्ंिवटल झाली असून, बाजारभाव २६११ ते ३१११ रुपये तर सरासरी २९८० रुपयांपर्यंत होते. मक्यास व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकूण आवक ३६१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ११५१ ते १४८० रुपये तर सरासरी १३६१ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत राहिल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा