शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

बसचालकास मारहाण करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:10 IST

सारडा सर्कल येथे राज्य परिवहन महामंडळाची धावती बस भर रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि साडेपाच हजार रु पये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नऊ वर्षांपूर्वी घडला होता.

नाशिक : सारडा सर्कल येथे राज्य परिवहन महामंडळाची धावती बस भर रस्त्यात अडवून चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीला एक वर्षाचा कारावास आणि साडेपाच हजार रु पये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नऊ वर्षांपूर्वी घडला होता.वेणाराम पुणाराम चौधरी (रा. सिद्धिविनायक पार्क, गणेशबाबानगर, अशोकामार्ग) याने बसचालक वाळिबा नामदेव आव्हाड यांच्या बसचा स्कूटरने (एमएच१५ सीई ३६२२) पाठलाग करत सारडासर्कल येथे २१ आॅगस्ट २०१० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस अडविली. सारडा सर्कलवर आरोपी चौधरी याने त्याची स्कुटर बसपुढे उभी करून रोखली. कुरापत काढून बसचालक आव्हाड यांना शिवीगाळ करत बसमधून खाली ओढून बेदम मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या अंगावरील सरकारी खाकी गणवेशदेखील फाटला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवालदार बी. एस. जाधव यांनी करत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. बी. नाईक-निंबाळकर यांच्या न्यायालयात चालले.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अपर्णा पाटील यांनी कामकाज पाहताना सहा साक्षीदार तपासले होते. यातील तीन साक्षीदारांनी फितुरी केली होती. तरीही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी चौधरी यास १ वर्षे साध्या कारवासाची आणि ५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी