शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगरात डासांचा प्रादुर्र्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:16 IST

महापालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व कर भरूनही साध्या मूलभूत समस्यांची सोडवणूक केली जात नाही. परिसरातील खासगी प्लॉटवर वाढलेले गाजरगवत व याच बाजूने जाणाऱ्या उघड्या नाल्यामुंळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाने मूलभूत सुविधांकडे तरी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सिडको : महापालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व कर भरूनही साध्या मूलभूत समस्यांची सोडवणूक केली जात नाही. परिसरातील खासगी प्लॉटवर वाढलेले गाजरगवत व याच बाजूने जाणाऱ्या उघड्या नाल्यामुंळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाने मूलभूत सुविधांकडे तरी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मधील लक्ष्मीनगर, इंद्रनगरी भागातील नागरिकांना मनपाकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. येथील लक्ष्मीनगर भागातील खासगी मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढलेले असून, याच ठिकाणी नैसर्गिक उघडा नालादेखील आहे. या नाल्याची दुरवस्था झाली असून, नाल्यातून कायमच सरपटणारे प्राणी बाहेर येऊन घरात शिरत असल्याचे प्रकार अनेकदा झाले आहे. खासगी मोकळ्या जागेत वाढलेल्या गाजरगवतामध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात. वाढलेल्या गवतामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून, मागील वर्षी काही नागरिकांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली आहे. याबाबत मनपाने संबंधित जागा मालकावर कारवाई करण्याची गरज असून, मोकळ्या जागेतील घाण व वाढलेले गाजरगवत साफ करण्याची मागणीही येथील रहिवाशांनी केली आहे. याच भागात असलेल्या उद्यानाचे काम रखडले असून, उद्यानाच्या जॉगिंग ट्रॅकवर गाजरगवत वाढलेले आहे. या उद्यानात रात्रीच्यावेळी टवाळखोरांचा वावर असल्याने गस्त घालून टवाळखोरांवर कारवाई करण्याची गरज आहे.परिसरातील पथदीप रात्रीच्या वेळी अनेकदा बंद असल्याने चोºया व घरफोड्या झाल्या असल्याचेही नागरिकांनी सांगितले. तसेच अंधार अधिक असल्याने पथदीपांची संख्या वाढवावी. येथील एका ठिकाणी विद्युत पोल आहे; परंतु त्यावर पथदीप नसल्याने तेथे पथदीपांची व्यवस्था करावी, असेही नागरिकांनी सांगितले. मनपाने लक्ष्मीनगर, इंद्रनगरी भागातील मूलभूत समस्या त्वरित सोडविण्याची अपेक्षा संगीता रावते, आशा ढोकळे, वंदना गवळी, कन्हैया परदेशी यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य