शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृतीत गुरूकुल परंपरेला महत्त्व : बंडातात्या कराडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:19 IST

संतांचा आदर्श जीवनात जोपासण्याची गरज आहे. तसेच भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेला महत्त्व आहे, असा उपदेश बंडातात्या महाराज कराडकर यांनी कीर्तनातून केला.

देवळाली कॅम्प : संतांचा आदर्श जीवनात जोपासण्याची गरज आहे. तसेच भारतीय संस्कृतीत गुरुकुल परंपरेला महत्त्व आहे, असा उपदेश बंडातात्या महाराज कराडकर यांनी कीर्तनातून केला.श्री क्षेत्र लहवित येथील वाडीचा मळा येथे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू व आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सद्गुरू जोग महाराज यांच्या शंभराव्या पुण्यस्मरणानिमित्त शताब्दी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ कराडकर यांच्या कीर्तनाने झाला. यावेळी बंडातात्या महाराज कराडकर म्हणाले की, मस्तक हे संतांच्या चरणी झुकले पाहिजे, ज्यामुळे भारतीय संस्कारातील गुरु कुल पद्धती जोपासली जाते. हीच पद्धती संस्कृतीचा प्राण आहे. त्यामुळे भारतात संस्कृती टिकून समृद्धी नांदत असते. संस्कार जोपासण्यासाठी आज आदर्शांची गरज आहे आणि आदर्श हे जोपासण्यासाठी संतांची गरज असल्याचा उपदेश त्यांनी यावेळी उपस्थित भाविकांना केला.तसेच नवीन पिढीने आपल्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच संस्कृती टिकेल असेही बंडातात्या महाराज कराडकर यांनी सांगितले.याप्रसंगी गुरुवर्य शिवराम महाराज म्हसकर, महंत द्वाराचार्य लहवितकर महाराज, त्र्यंबकराव गायकवाड, वासुदेव गायकवाड, दीपक देशमुख, दत्तू सहाणे आदींसह वारकरी सांप्रदायातील मान्यवरांसह भगूर, देवळाली कॅम्प, लहवित पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कार सोहळाउद्योजक जी. के. जाधव यांच्यासह उपस्थित संतवृंदाच्या हस्ते कलशस्थापना व वीणापूजन करण्यात आले. सकाळी सुदाम महाराज घाडगे यांचे कीर्तन तर सांयकाळी गणेश महाराज करंजकर यांचे प्रवचन झाले. कराडकर यांना कीर्तनप्रसंगी गायन साथ तुकाराम आरोटे, बनाजी वाकचौरे, योगेश धात्रक, ज्ञानेश्वर तुपे यांनी तर मृदूंगावर विकास बेलूकर, भूषण जाधव यांनी साथ दिली. यावेळी उपस्थित संतवृंदाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक