कामगारामध्ये जागरुकता निर्माण करु न माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी कामगारामध्ये सह्यांची मोहिम राबविली. ३२०० पैकी २३५० कामगारांनी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २१ जून २०१९ रोजी संघटनेचे सरचिटणीस व अध्यक्ष यांना सह्यांचे निवदन दिले. त्यानंतर बंगलौर येथे या निवेदनाची प्रत एच ए एल कामगारांच्या शिष्टमंडळाने समन्वय समितीचे मुख्य समन्वयक सुर्यदेवरा चंद्रशेखर यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले. यावेळी संजय कुटे यांच्यासह आनंद गांगुर्डे, प्रकाश गभाले, प्रशांत आहेर,अविनाश कुलकर्णी, अनिल गवळी,रोशन कदम,श्रीकांत घुले, भावेश विसपुते राहूल कोळपकर,संतोष आहिरे ,प्रशांत जाधव, कमलेश मैंद,जयंता भंबारे आदी उपस्थित होते.
वेतन करार लागू करण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:41 IST