शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कृषीविषयक विधेयक लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:41 IST

सिन्नर : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करुन राज्यात कृषी विधेयक लागू करावे अशा मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने तहसीलदार राहूल कोताडे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देभाजपाचे तहसिलदारांना निवेदन: आंदोलनाचा इशारा

सिन्नर : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करुन राज्यात कृषी विधेयक लागू करावे अशा मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने तहसीलदार राहूल कोताडे यांना देण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संसदेत दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषीविषयक विधेयक मंजूर करुन शेतकर्‍यांच्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडवणारे पाऊल उचलले आहे. मात्र शेतकर्‍यांबद्दल कॉंग्रेस आणि विरोधक अकारण कांगावा व अप्रचार करुन राजकारण करीत आहेत. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकर्‍यांसाठी एक देश, एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी एसएमपी (किमान आधारभूत किंमत) कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचा व दिलेले स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला असून हा स्थगिती आदेश रद्द करुन महाराष्ट्रात कृषी विधेयक लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसिलदारांच्यावतीने नायब तहसिलदारांनी निवेदन स्विकारले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सोनल लहामगे, भाऊसाहेब शिंदे, सुनील माळी, दत्तात्रेय गोसावी, राजेश कपूर, डॉ. दिपककुमार श्रीमाली, सुभाष कर्पे, ज्ञानेश्‍वर कुर्‍हाडे, विशाल क्षत्रिय, सचिन गोळेसर, रविंद्र नाठे, चंद्रकला सोनवणे, सरला त्रिवेदी, अतुल गुजराथी, गोरख गोळेसर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण