वडनेर : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे.यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील प्रमुख पिके गहू, हरभरा व कांदा लागवडीत कमालीची वाढ झाली आहे. पाणी टिकून राहील या आशेने मोठ्या प्रमाणावर पिकांची पेरणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. परंतु सध्या बदललेले हवामान अधून मधून ढगाळ व दमट वातावरण यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वाढत आहे.पावसाचे प्रमाण यंदा प्रथमच चांगले झाल्याने सर्वांच्याच आशा उंचावल्या आहेत. यामुळे रब्बी हंगामातील पिकांमध्ये कमालीची वाढ झाली. गहू, हरभरा पेरणी तालुक्यात वाढलेली आहे. तसेच कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. खराब वातावरणामुळे कांद्याची रोपे खराब झाली होती, यामुळे शेतकºयांनी इकडून तिकडून रोपे विकत घेऊन कांदा लागवड केली आहे. यंदा सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात थंडी कमी अधिक प्रमाणात दिसून आली. रब्बी हंगामातील पिकांच्या पोषकतेसाठी महत्त्वाची मानली जाणारी थंडी प्रमाण कमी अधिक होत असल्याने पिकांच्या वाढीसाठी अडथळा तर बसणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कांदा, हरभरा या पिकांच्या समाधानकारक वाढीस थंडी पोषक असते. थंडीच्या मोसमात गहू, हरभरा पिकांची शेवटच्या टप्प्यात दमदारपणे वाढ होऊन फुलोºयात दाणे भरले जातात. बरोबरच लागवड झालेल्या कांद्याचे मिळालेल्या थंडीतून अधिक जोमाने वाढ उत्तम पद्धतीने कांदा पोसला जातो. मात्र गेल्या काही दिवसात परिसरातून गायब झालेली थंडी, वातावरणातील बदल हा शेतकºयांच्या उरात धडकी भरविणारा आहे.
बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:59 IST
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. यामुळे बदललेले हवामान रब्बी पिकांसाठी चिंता वाढविणारे ठरत आहे.
बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम
ठळक मुद्देवडनेर : दमट वातावरणाने शेतकऱ्यांत वाढली चिंता