नाशिक : जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी अधिग्रहित केल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे, कोरोना सेवेत असलेल्या शिक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याची मागणीही मुख्याध्यापक संघास विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी आपत्ती निवाराण कायद्यांतर्गत अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश शिक्षक गावसर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टोलनाके व अन्य सेवालाठी कार्यरत असल्याने, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका संभविण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने, शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचेही मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे यांनी नमूद केले आहे. सद्यस्थितीत लसीकरणासाठी अन्य नोंदणी आवश्यक असून, लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, शिक्षकांचे लसीकरणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे शिक्षकांना नोंदणी सक्तीची न करता, त्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
शिक्षकांना विमा कवच द्या
विनाअनुदानित आणि अंशत; अनुदानित, तसेच सेल्फ फायनान्स शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा कोरोना प्रतिबंधक कामासाठी अधिग्रहित करायची असेल, तर शासनाने या सर्व शिक्षकांचे तत्काळ लसीकरण करून, या शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवचही द्यावे.
- साहेबराव कुटे, कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
===Photopath===
110521\11nsk_21_11052021_13.jpg
===Caption===
साहेबराव कुटे प्रतिक्रियेसाठी फोटो