शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सारडा विद्यालयात गणेशमूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:09 IST

सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा वर्षांपासून विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा होत असते. विद्यार्थिदशेतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती व्हावी या हेतूने ही कार्यशाळा संपन्न होत असते. विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी होत आकर्षक गणेशमूर्ती साकारत असतात व त्याच मूर्तीची आपल्या घरी प्रतिष्ठापना करत असतात.

सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा वर्षांपासून विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा होत असते. विद्यार्थिदशेतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती व्हावी या हेतूने ही कार्यशाळा संपन्न होत असते. विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी होत आकर्षक गणेशमूर्ती साकारत असतात व त्याच मूर्तीची आपल्या घरी प्रतिष्ठापना करत असतात.यावर्षी शाळा बंद असल्याने कार्यशाळा घेता आली नाही म्हणून कलाशिक्षक राहुल मुळे यांनी शाडूमातीची मूर्ती बनविण्याचा व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवला व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून क्रमाक्रमाने गणेशमूर्ती तयार करून घेतली. विद्यार्थ्यांनी स्व-कल्पनांचा उपयोग करून आपल्या परिवारासह पर्यावरणपूरक शाडूमातीपासून गणेशमूर्ती साकारल्या होत्या. विद्यालयातही शाडूमातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विद्यालयातील गणेशमूर्तीचे, बापूसाहेब पंडित व सौ. रेखा पंडित यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करून पर्यावरणपूरकरीत्या विसर्जन करण्यात आले. निर्माल्याचा उपयोग विद्यालयातील झाडांना खत म्हणून करण्यात आला. यावेळी प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक सुनील हांडे, राहुल मुळे, अण्णा जाधव, रोहिणी परदेशी, छाया मढे, स्मिता पाटोळे, कविता गायकवाड, वसंत पैठणकर, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक जाधव, कांतिलाल राठोड, गणपत बेजेकर, महेंद्र गुरव, खेमराज जोशी, टीका जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSchoolशाळा