शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

इंटरमिजीएटच्या विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा;सुधारित निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:22 IST

नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र गुणदान पद्धत आणि या संदर्भातील अटींविषयी प्रचंड तक्रारी आल्यानंतर आता शासनाने सुधारित निर्णय घेतला असून, सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थी निव्वळ इंटरमिजिएट उत्तीर्ण असला तरी त्यास सवलतीचे गुण मिळणार आहे. मात्र ही सवलत केवळ एकाच ...

ठळक मुद्देपुढीलवर्षी चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा असेल तरच सवलत केवळ इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यालाही सात गुण दिले जाणार

नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र गुणदान पद्धत आणि या संदर्भातील अटींविषयी प्रचंड तक्रारी आल्यानंतर आता शासनाने सुधारित निर्णय घेतला असून, सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थी निव्वळ इंटरमिजिएट उत्तीर्ण असला तरी त्यास सवलतीचे गुण मिळणार आहे. मात्र ही सवलत केवळ एकाच वर्षासाठी असून पुढीलवर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जात असल्याने निकालाचा फुगवटा वाढल्याची ओरड होते. शिक्षणक्षेत्रातून तर याविषयी संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. असे असले तरी बालमानसशास्त्र आणि मुलांमधील आक्रमकता यांचाही विचार झाला पाहिजे, अशी भूमिका बालमानसशास्त्रज्ञांनी मांडल्यामुळे सवलतीच्या गुणांबाबत विचार करताना शिक्षण विभागाला सावध भूमिका घ्यावी लागत आहे.कलाक्षेत्राची सेवा करणाºया दहावीच्या विद्यार्थ्याला त्याच्या कौशल्याचे गुण मिळावेत म्हणून कलाक्षेत्राशी निगडित विद्यार्थ्याला दहावीत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असे करताना काही अटी लादण्यात आल्या होत्या. त्यास कलाशिक्षकांच्या संघटनांनी वारंवार विरोध करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार या निर्णयात काहीअंशी बदल करण्यात आले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निर्णयानुसार ‘एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय विद्यार्थ्याला इंटरमिजीएट ड्रॉर्इंग परीक्षेचे अतिरिक्त गुण दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु यात आता बदल करण्यात आला असून केवळ इंटरमिजीएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यालाही सात गुण दिले जाणार आहे. एलिमेंटरी परीक्षा न देताही आता विद्यार्थी इंटरमिजीएटला अतिरिक्त गुणांचा लाभ होऊ शकतो.मात्र हा निर्णय केवळ एकाच वर्षासाठी ठेवण्यात आला असून पुढीलवर्षी म्हणजेच २०१९ मार्च महिन्याच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकeducationशैक्षणिक