शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:47 AM

पीककर्ज वाटपासंदर्भात राष्टयीकृत बॅँकांची बैठक बोलावून कर्जमाफीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्या. दरम्यान, शेतकºयांनी पीक कर्जासाठी त्वरित राष्टÑीयीकृत बॅँकांकडे सातबारासह अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाशिक : पीककर्ज वाटपासंदर्भात राष्टयीकृत बॅँकांची बैठक बोलावून कर्जमाफीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्या. दरम्यान, शेतकºयांनी पीक कर्जासाठी त्वरित राष्टÑीयीकृत बॅँकांकडे सातबारासह अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.खरिपाच्या पेरणीसाठी शेतकºयांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासंदर्भात राधाकृष्णन यांनी सोमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बॅँकांच्या अधिकाºयांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी पीक कर्जासाठी आलेल्या शेतक-यांच्या अर्जावर गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घेत आठवडाभरात कर्जाची रक्कम मंजूर करण्याच्या सूचना केल्या. याबाबत जनजागृती म्हणून गावपातळीवर मेळावे घेण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिला. जिल्हा बॅँकेने ८३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यंदाचा वार्षिक आराखडा २ हजार ६२५ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. शेतकºयांच्या सातबारांवर २४ तासांत बोझा चढवून दाखल प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना राधाकृष्णन बी यांनी बॅँकांच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी २४० कोटी रुपयांचे क र्ज दिले आहे.सरकारच्या कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकºयांनी आपल्या सातबारासह आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडून पीककर्ज अर्ज राष्टÑीयीकृत बॅँकांकडे करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अद्याप एकूण ३२३ कोटी रुपयांचे कर्ज विविध बॅँकांकडून जिल्ह्यातील शेतकºयांना वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय