शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

मनसेचे हवेत इमले

By admin | Updated: June 7, 2014 01:46 IST

स्थायी समितीचेच अंदाजपत्रक तब्बल तीन हजार कोटींवर गेले आहे.

नाशिक : महापालिकेला अगोदरच उत्पन्न मिळवणे मुश्कील झाले असताना, स्थायी समितीने मात्र कोट्यवधी रुपये जमा होतील असा अंदाज दाखवत आयुक्तांचे अंदाजपत्रक एक हजार कोटी रुपयांनी फुगवले आहे. त्यामुळे यंदा स्थायी समितीचेच अंदाजपत्रक तब्बल तीन हजार कोटींवर गेले आहे. विरोधकांनी त्यावर मनसेची ही गंमत असल्याची खिल्ली उडवली आहे.महापालिकेत मनसेची सत्ता असून, अर्धे वर्ष संपले तरी स्थायी समितीने अंदाजपत्रकच प्रशासनाकडे सादर केले नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी याबाबत टीका केल्यानंतर आज घाईघाईने स्थायी समितीचे अंदाजपत्रक लेखा विभागाकडे पाठविण्यात आले. परंतु सदरचे अंदाजपत्रक विरोधकांच्या हाती लागल्यानंतर त्यातील धक्कादायक आकडेमोड समोर आली आहे. आयुक्तांनी स्थायी समितीला १९९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून ते तयार केले होते; परंतु प्रशासनाने जितकी रक्कम जमा दाखवली त्यापेक्षा कैकपटीने अधिक रक्कम जमा होईल असा दावा करीत स्थायी समितीने त्यावर आधारित खर्च बाजू दाखवली आहे. जी रक्कम जमाच होणार नाही ती जमा दाखवून त्यावर आधारित अंदाजपत्रक हास्यापद असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. कुंभमेळ्यासाठी शासनाकडून २५० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल असा अंदाज असताना, स्थायी समितीने ७१९ कोटी रुपये शासन देईल असा अंदाज दाखवला आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाची अंमलबजावणीच होऊ शकत नाही, असे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर आणि शहर विकास आघाडीचे गटनेते गुरुमित बग्गा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)