शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

अवैध वाहतूक : १९ लाखांचा चार हजार किलो सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:20 IST

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राऊ चौकी जवळ नाकाबंदी दरम्यान बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुमारे 19 ...

ठळक मुद्देचालकासह दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राऊ चौकी जवळ नाकाबंदी दरम्यान बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुमारे 19 लाख रुपयांची अंदाजे 4 हजार किलो सुगंधित तंबाखू माल पकडला आहे.शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी सुरू असतांना पोलिसांना (एमएच 10 ए क्यू 6140) चारचाकी ट्रक संशयास्पद जातांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू भरलेली असल्याचे निष्पन्न झाले याबाबत पोलिस ठाण्यात माहिती कळविण्यात येऊन सदर ट्रक पोलिस ठाण्यात नेण्यात आला.

पोलिस ठाण्यात सदर ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधित तंबाखू पोते आढळून आले. पोलिसांनी सुगंधित तंबाखू माल, चारचाकी वाहन तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. सुगंधित तंबाखू व वाहन असा जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सांगितले.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTobacco Banतंबाखू बंदी