नाशिक : केवळ केंद्रशासित प्रदेशात विक्रीची परवानगी असलेले तसेच महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करणारी मारुती कार सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ते वाझदा मार्गावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़१४) पकडली़या कारचा चालक फरार झाला असून, पोलिसांनी मारुती कार व मद्यसाठा असा २ लाख १५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़ पोलिसांची चाहूल लागताच कारचालक फरार झाला होता़ पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जेक़े़सूर्यवंशी, शांताराम घुगे, संदीप शिरोळे, पोलीस नाईक वसंत खांडवी, जालिंदर खराटे यांच्या पथकाने ही कारवाई केली़सुरगाणा परिसरातून अवैध मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती़ त्यानुसार उंबरठाण ते वाझदा रोडवरील गोंदुणे गाव शिवारात एक सफेद रंगाची मारूती ८०० कार (जीजे १६, के ४३०३) संशयास्पदरित्या उभी असलेली दिसली़ पोलिसांनी या कारची तपासणी केली असता त्यामध्ये जॉन मार्टिन व्हिस्कीच्या ११५२ बाटल्या आढळून आल्या़
सुरगाण्यात अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:16 PM
केवळ केंद्रशासित प्रदेशात विक्रीची परवानगी असलेले तसेच महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करणारी मारुती कार सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ते वाझदा मार्गावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़१४) पकडली़
ठळक मुद्देकार जप्त : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल