शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जिल्ह्यात सव्वादोन लाखांची अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देचार दिवसात ३५ गुन्हे दाखल साडेचारशे लिटर हातभट्टी गावठीचा समावेश

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत ३५ गुन्हे दाखल करण्यात येऊन ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी मुंबई-आग्रारोडवर गावठी दारूची वाहतूक करणारी रिक्षा ताब्यात घेऊन ४५० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.गुरुवारी सकाळी इगतपुरीकडून नाशिकडे येणारी रिक्षा (एम. एच. १५ झेड ९०६७) अडवून भरारी पथकाने तपासणी केली असता, त्यात सुमारे ४५० लिटर गावठी दारू भरलेले १८ प्लॅस्टिकच्या टाक्या आढळून आल्या. निरीक्षक संतोष चोपडेकर, दुय्यम निरीक्षक जयराम जाखेरे यांनी सदरची रिक्षा ताब्यात घेऊन दारूची वाहतूक करणारा सरताज रमेश रोकडे, रा. समतानगर, आगरटाकळी यास अटक केली आहे. बुधवारीदेखील पथकाने अंबड औद्योगिक वसाहतीत व चुंचाळे परिसरात गस्त घालत असताना देशीदारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. सदरची कारवाई उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, जवान विलास कुवर, सुनील पाटील, विरेंद्र वाघ, विष्णू सानप, पूनम भालेराव, रतिलाल पाटील, धनराज पवार आदींनी पार पाडली आहे.संशयित साबळे याला अटककारमध्ये देशी दारूच्या ३८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. पथकाने मारुती कारसह सुमारे ६७ हजार ५७६ रुपये किमतीचा मुदेमाल जप्त केला असून, संशयित वैभव बाळू साबळे, यास ताब्यात घेतले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ५८१ गावठी दारू, १७०० लिटर रसायन, २१९ लिटर देशी दारू, १५० लिटर ताडी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदी