शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बेकायदेशीर गाळे उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:42 IST

दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलमध्ये गाळे उभारण्यासाठी भिंती तोडून अनधिकृतपणे गाळे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेल हॉलचे बांधकाम तोडताना जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सभापती शिवाजी चुंबळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे सेल हॉलमध्ये गाळे उभारण्यासाठी भिंती तोडून अनधिकृतपणे गाळे बांधकाम जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाहीबाजार समितीचा आर्थिक हितासाठी निर्णय- शिवाजी चुंबळे

पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलमध्ये गाळे उभारण्यासाठी भिंती तोडून अनधिकृतपणे गाळे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेल हॉलचे बांधकाम तोडताना जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सभापती शिवाजी चुंबळे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बाजार समितीतील सेल हॉलमध्ये समितीच्या आर्थिक हितासाठी १२ बाय १५ आकाराचे तब्बल ६२ गाळे तयार करून ते जीएसटी कर आकारणीसह मासिक बारा हजार रु पयांप्रमाणे भाडे करार पद्धतीने देण्याची तयारी सभापती चुंबळे यांनी केली होती. गेल्या आठवड्यात या गाळे उभारणीसंदर्भात बैठक बोलावली होती, मात्र बैठकीत या गाळ्यांना व्यापारी वर्गाने कडाडून विरोध केला होता.  बाजार समितीच्या दोन सेल हॉलमध्ये डझनभर व्यापारी व्यावसायिक बाजार समितीला शुल्क व भाडे देतात. काही दिवसांपूर्वी भाडे कमी असल्याचे कारण नमूद करून सभापतींनी व्यापाºयांना नोटिसा बजावल्या होत्या. बाजार समितीत गाळे उभारणी करण्यासाठी कलम १२/१ नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र बाजार समितीने सेल हॉलचे बांधकाम तोडताना व गाळे उभारणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाही. तसेच गाळे उभारणीचा ठराव झाला नाही व त्यातल्या त्यात बैठकीत कोणत्याच प्रकारची मंजुरीही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय काही संचालक गाळे उभारणीबाबत अंधारात असल्याचे बोलले जात आहे.बाजार समितीने दुरुस्ती कामासाठी तसेच गाळे उभारणीसाठी परवानगी घेतलेली नाही. नियमाने परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही कामासाठी स्ट्रक्चरल आॅडिट करणे गरजेचे असते. - नीळकंठ कºहे,  जिल्हा उपनिबंधकबाजार समितीचा आर्थिक हितासाठी निर्णयबाजार समितीत सेल हॉल पूर्वीपासून आहे. केवळ गाळ्यांना शटर्स टाकण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा उपनिबंधकांना प्रस्ताव सादर केला आहे. तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीचा प्रश्न नाही. ६२ गाळे उभारणी करून ते भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.- शिवाजी चुंबळे, सभापती, बाजार समिती

टॅग्स :market yardमार्केट यार्ड