शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाहन तपासणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 18:50 IST

कळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सिर्टिफकेट-पीयूसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकळवण : साडेचार लाख वाहनांसाठी केवळ तीन पीयूसी सेंटर

मनोज देवरेकळवण : वाहनांच्या वाढत्या संख्येने प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी किमान दहा हजार किलोमीटर अंतर चाललेल्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सिर्टिफकेट-पीयूसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून ही चाचणी करण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र मालेगाव विभागात फक्त तीनच पीयूसी सेंटर असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.शहरासह ग्रामीण भागात वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वाहनांमुळे प्रदूषण हि मोठ्या प्रमाणात होत असून धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. वाहनाने दहा हजार किलोमीटरची मर्यादा ओलांडल्यानंतर पीयूसी करणे बंधनकारक असले तरी त्याकडे वाहनचालक कानाडोळा करत असल्याचे चित्र असून उपप्रादेशिक परिवहन विभागाचेही दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.हि वाहने धावतायेत रस्त्यावरवाहनांचा प्रकार वाहनांची संख्यादुचाकी ३३४५८०कार आण िजीप ३०१५८आॅटोरिक्षा ३९८७ट्रक ५५८८ट्रॅक्टर ३०६३७ट्रेलर्स २०१८१स्कुल बस २७६टँकर्स २१२टेम्पो,जेसीबी,अँब्युलन्स १५०१८बस ६६टॅक्सी १४९७एकूण ४,४७,६००प्रदूषित वाहने तपासणीचे दर-मोटार वाहन अधिनियम १८९९ मधील तरतुदीनुसार मोटार वाहनांची वायू तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू तपासणी केंद्रांना देण्यात आले आहे.याप्रमाणे दुचाकीसाठी ३५ रु पये, तीनचाकी ७० चारचाकी ९०, डिझेलवरील वाहने ११० रु पये आकारणे आवश्यक आहे.वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तीन ठिकाणी पीयूसी सेंटर असून तीन सेंटर प्रस्तावित आहेत.ड्रायिव्हंग स्कुल किंवा संस्था, व्यक्ती यांना पीयूसी सेंटर सुरु करायचे असल्यास त्यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क करावा.- किरण बिडकर, उपप्रादेशिक अधिकारी, परिवहन विभाग, मालेगाव.वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिवारणालाही त्याची हानी पोहचत आहे. वाहनधारकांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून वाहनांची नियमित तपासणी करून घ्यावी. उपप्रादेशिक विभागाने याबाबतीत लक्ष घालावे.-डॉ. किशोर कुवर, अध्यक्ष महाराष्ट्र पर्यावरण विकास संस्था.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक