शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सेवेतून मुक्त करण्याच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष; शिक्षकात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 13:39 IST

भाऊसाहेबनगर : शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोना संदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षक वर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमधे नाराजी पसरली आहे . दरम्यान, शिक्षकांची या कामातुन त्वरित मुक्तता करावी अशी मागणी निफाड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमागणी : निफाडच्या नायब तहसीलदारांसह, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन दरम्यान जवळजवळ तीन महिने शिक्षक रेशन दुकान,चेकपोस्ट, कंण्टेमेण्ट झोन,टोलनाका, रेल्वेस्थानक याठिकाणी रात्री,विना सुरक्षा साधनासह सेवा देत आहेत. मार्गदर्शक तत्व अव्हेरु नही नेमणुका असताना आपत्तीचा काळ म्हणून शिक्षकांनी सेवा दिली. मात्र शाळा सुरु होत असताना सर्वत्र या सेवेतुन शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी होऊ लागली असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात दि. २३ जूनला अशी मागणी तहसीलदारांकडे तर शिक्षक आमदारांनी शिक्षणमंत्र्याकडे दि. २४ जूनला केली होती. शालेय शिक्षण विभागाने त्याचदिवशी परिपत्रक काढून शिक्षकांची सदर कामातून मुक्तता करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही शिक्षकांची सेवेतून मुक्तता तर झाली नाही शिवाय पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले जात आहेत. वस्तुत: आरोग्य, महसुल, पोलीस या यंत्रणेबरोबर तीन म्ािहने काम केले. त्यात थोडी कसुर झाली तर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. आता शाळा सुरु होण्याचे नियोजन,आॅनलाईन शिक्षण, प्रवेश प्रक्रि या, पुस्तक वाटप, पोषण आहार आदींसह इतर कामे करणे आवश्यक आहे. यासाठी शाळेत बोलविण्याचे मार्गदर्शक तत्वही ठरविलेले आहे. शिक्षकांची संख्या अपुरी, कोरोना सेवेत शिक्षक यामुळे मुख्याध्यापक वर्गाची अडचण होत आहे. याचा परिणाम यावर्षीच्या शैक्षणिक बाबीवर होण्याची भिती निवेदनात वर्तविली आहे. यासाठी शिक्षकांची सदर सेवेतून त्वरित मुक्तता करावी अशा मागणीचे निवेदन निफाडच्या नायब तहसिलदार कल्पना निकुंब व गटशिक्षणाधिकारी यांना निफाड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आले. निवेदनावर संजय गिते, समीर जाधव, चंद्रकांत कुशारे,मुकुंद जाधव,बाबा गुंजाळ,देविदास सोनवणे, नितीन डोखळे, संजय भोई, मधुकर सोनवणे, बाळासाहेब देवरे, एस. बी. जाधव, एस. बी. सैंदाणे, जी. डी. कांदळकर, एम. आर. सुर्यवंशी, किरण जाधव, एल. डी. भरसट आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण