शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 21, 2014 01:02 IST

स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष

मालेगाव : कायम केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मनपा प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे. गलिच्छ शहर अशीच शहराची ओळख कायम असून, शहर वर्षभर विविध साथींच्या आजारांनी त्रस्त राहत आहे. हद्दवाढ भागासह शहरातील लोकसंख्या एकीकडे वाढत असताना त्यातुलनेत येथील महानगरपालिका सफाई कामगारांची संख्या वाढलेली नाही. दुसरीकडे साफसफाईचा देण्यात आलेला खासगी ठेका हा भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेला आहे. शहरातील काही ठराविक भाग वगळता बहुतांश भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी अजूनही म्हणावी तशी जागरूकता नाही.एक हजार लोकसंख्येमागे एक झाडूकामगार, एक गटार कामगार व एक सफाई कामगार असे तीन कामगार असावयास हवेत. त्या हिशेबाने साधारण सात लाख लोकसंख्येच्या मालेगाव महानगरपालिकेत कायम २१०० व अतिरिक्त तीनशे असे २४०० कामगार असावयास पाहिजे. मात्र आजमितीस मनपात त्यापेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे जवळपास अकराशेच कामगार आहेत. विशेष म्हणजे त्यातही खुद्द मनपा प्रशासनाच्या कामगारांची संख्या ही अवघी साडेसहाशे असून, उर्वरित साडेचारशे कामगार हे खासगी ठेकेदाराकडील आहेत. यातही जे पदवीधर, पदव्युत्तर आहेत; परंतु मनपात भरती होताना कामगार म्हणून रुजू झाले आहेत ते मात्र प्रत्यक्षात आपल्या शिक्षणाचा सदुपयोग म्हणून मनपाच्या विविध खात्यांमध्ये कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत. किरकोळ रजा, आजारपण, लग्नादी कार्यासाठी रजेवर असणाऱ्यांची संख्या लक्षात घेता प्रत्यक्षात शहर साफसफाईसाठी रोज मनपाचे पाचशे कामगार देखील उपलब्ध असतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्याउपर शहरसाफसफाई कशी, कितीवेळ, कोणत्या पद्धतीने होते हादेखील स्वतंत्र विषय आहे. ज्या गाड्या कार्यरत आहेत त्या विशिष्ट भागात विशिष्ट लोकप्रतिनिधींच्या वॉर्डातच अधूनमधून कार्यरत दिसून येतात. मालेगाव शहरातून घंटागाड्यांमधून रोज १९० ते २०० टन किंवा त्याहून अधिक कचरा उचलला जात असल्याचा मनपा स्वच्छता विभागाचा दावा आहे. मात्र या दाव्याविषयीदेखील येथे वाद असून, कमी कचऱ्याचे ट्रॅक्टर्स जास्त वजनाचे दाखवून मनपाचा पैसा लाटला जास्त असल्याचा आरोप मनपातील विरोधी जनता दल गटनेत्यांकडून यापूर्वी पुराव्यानिशी करण्यात आलेला आहे. देशभरात सध्या स्वच्छ भारत मोहीम जोरात सुरू आहे. मात्र दरवेळेस केंद्र व राज्य शासनाकडे आर्थिक अनुदानाच्या अपेक्षेने डोळे लावून पाहणाऱ्या येथील स्थानिक मनपा प्रशासन व प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी पक्षातर्फे तशी कुठलीही मोहीम येथे अद्याप राबविण्यात आलेली नाही. शहर - तालुक्यात देखील विविध शाळा - महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबविली जात आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया, अतिसारचे रुग्ण प्रमाणापेक्षा अधिक आढळून आल्यानंतरदेखील शहर स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष अशी मोहीम राबविली गेलेली नाही.याउलट शहरातील मोसम नदीकाठ, नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, विविध प्रमुख सरकारी कार्यालये, विविध छोटी-मोठी हॉटेल्स परिसरातील नेहमीचा घाणकचरा हा कायमच आहे.