नाशिक : इगतपुरीकडे जाणार्या दुचाकीला नॅनोकारने दिलेल्या धडकेत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली़ दरम्यान, या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील मानीखांब येथील रहिवासी मैनाबाई नामदेव माळी (६५) या दुचाकीवर पाठीमागे बसून मुंढेगावकडून इगतपुरीला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जात होत्या़ शगून हॉटेलजवळ दुचाकी आली असता एका नॅनोकारने त्यांना पाठीमागून धडक दिली़ या अपघातात मैनाबाई माळी यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना प्रथमोपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ शेख यांनी मयत घोषित केले़ (प्रतिनिधी)
नॅनोच्या धडकेत इगतपुरीची वृद्धा ठार
By admin | Updated: May 28, 2014 01:16 IST