शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

इगतपुरी, त्र्यंबकमध्ये सेना-भाजपाची पकड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 9:38 PM

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह शिवसेना व भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखत आपले पारंपरिक बालेकिल्ल्यांवर पकड कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देनगरपालिका निवडणूक विश्लेषण

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह शिवसेना व भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखत आपले पारंपरिक बालेकिल्ल्यांवर पकड कायम ठेवली आहे.जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाºया इगतपुरी नगरपालिकेवर २५ वर्षांपासून शिवसेनेची जबरदस्त पकड आहे. थेट नगराध्यक्षपदावर स्वत: इंदुलकर यांनी भाजपाचे फिरोज पठाण यांचा दारुण पराभव केला. इंदुलकर यांच्या सुयोग्य नियोजनाने शिवसेनेला १८ पैकी १३ जागा जिंकता आल्या असून गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिक जागा शिवसेनेने जिंकल्या. रिपाइंची युतीही त्यांना तारक ठरली. इगतपुरी शहरात शिवसेना आणि संजय इंदुलकर हे समीकरण जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहे. शिवसेनेतून विकासाच्या मुद्द्यावर बाहेर पडलेल्या भाई ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला जनतेने तिसºया क्रमांकावर फेकले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विकासासाठी इगतपुरी नगरपालिकेला १०० कोटी रुपये देण्यात येतील असे सांगितले; मात्र इगतपुरी शहराने त्यांनाही साफ नाकारले. अवघ्या चार जागा त्यांच्या पदरात टाकल्या. भाजपा नेत्यांची व्यूहरचना येथील नागरिकांना भुलवू शकली नाही. काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर नेऊन ठेवत या पक्षाचे उरलेसुरले अस्तित्वही जनतेने संपवले.त्र्यंबकेश्वरमध्ये उमेदवारांची ‘अचूक’ निवड, अभ्यासू रणनीतीगळाला लावलेले व काही चलती असलेला पक्ष म्हणून स्वत:हून पक्षांतर करुन आलेल्या सक्षम उमेदवारांच्या जोरावर भाजपाने नगराध्यक्षपदासह १७ पैकी १४ जागा जिंकून तालुक्यावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणूकीच्या सहा महिने आधी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सावरा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला त्याचवेळेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चित झाले होते. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच.भाजपाच्या रणनीतीसमोर आदिवासींची मोठी वोटबॅँक पाठिशी असलेले उमेदवार बाळु कमळु झोले नगराध्यक्षपद भूषविलेले काँग्रेसचे सुनील अडसरे, माजी नगराध्यक्ष व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यादवराव तुंगार यांचे चिरंजीव असलेले शिवसेनेचे धनंजय तुंगार, भाजपाने उमेदवारी नाकारलेले अपक्ष उमेदवार अ‍ॅड. पराग गिरीश दीक्षित आदिंचा टिकाव लागला नाही. लोहगावकर याची भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्रिचती झाल्यामुळे पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस पक्षाचे असलेले अडसरे हे शिवसेना, मनसे व भाजपामार्गे पुन्हा कॉँग्रेसमध्ये गेले. परंतु तेथेही त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली.