इगतपुरी, त्र्यंबकमध्ये सेना-भाजपाची पकड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:38 PM2017-12-11T21:38:33+5:302017-12-11T21:42:49+5:30

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह शिवसेना व भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखत आपले पारंपरिक बालेकिल्ल्यांवर पकड कायम ठेवली आहे.

Igatpuri, Trivambak retains the grip of army and BJP | इगतपुरी, त्र्यंबकमध्ये सेना-भाजपाची पकड कायम

इगतपुरी, त्र्यंबकमध्ये सेना-भाजपाची पकड कायम

Next
ठळक मुद्देनगरपालिका निवडणूक विश्लेषण

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह शिवसेना व भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखत आपले पारंपरिक बालेकिल्ल्यांवर पकड कायम ठेवली आहे.
जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाºया इगतपुरी नगरपालिकेवर २५ वर्षांपासून शिवसेनेची जबरदस्त पकड आहे. थेट नगराध्यक्षपदावर स्वत: इंदुलकर यांनी भाजपाचे फिरोज पठाण यांचा दारुण पराभव केला. इंदुलकर यांच्या सुयोग्य नियोजनाने शिवसेनेला १८ पैकी १३ जागा जिंकता आल्या असून गेल्या पंचवार्षिकपेक्षा अधिक जागा शिवसेनेने जिंकल्या. रिपाइंची युतीही त्यांना तारक ठरली. इगतपुरी शहरात शिवसेना आणि संजय इंदुलकर हे समीकरण जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहे. शिवसेनेतून विकासाच्या मुद्द्यावर बाहेर पडलेल्या भाई ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला जनतेने तिसºया क्रमांकावर फेकले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विकासासाठी इगतपुरी नगरपालिकेला १०० कोटी रुपये देण्यात येतील असे सांगितले; मात्र इगतपुरी शहराने त्यांनाही साफ नाकारले. अवघ्या चार जागा त्यांच्या पदरात टाकल्या. भाजपा नेत्यांची व्यूहरचना येथील नागरिकांना भुलवू शकली नाही. काँग्रेसला चौथ्या क्रमांकावर नेऊन ठेवत या पक्षाचे उरलेसुरले अस्तित्वही जनतेने संपवले.
त्र्यंबकेश्वरमध्ये उमेदवारांची ‘अचूक’ निवड, अभ्यासू रणनीतीगळाला लावलेले व काही चलती असलेला पक्ष म्हणून स्वत:हून पक्षांतर करुन आलेल्या सक्षम उमेदवारांच्या जोरावर भाजपाने नगराध्यक्षपदासह १७ पैकी १४ जागा जिंकून तालुक्यावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणूकीच्या सहा महिने आधी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सावरा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला त्याचवेळेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चित झाले होते. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच.
भाजपाच्या रणनीतीसमोर आदिवासींची मोठी वोटबॅँक पाठिशी असलेले उमेदवार बाळु कमळु झोले नगराध्यक्षपद भूषविलेले काँग्रेसचे सुनील अडसरे, माजी नगराध्यक्ष व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यादवराव तुंगार यांचे चिरंजीव असलेले शिवसेनेचे धनंजय तुंगार, भाजपाने उमेदवारी नाकारलेले अपक्ष उमेदवार अ‍ॅड. पराग गिरीश दीक्षित आदिंचा टिकाव लागला नाही. लोहगावकर याची भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्रिचती झाल्यामुळे पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस पक्षाचे असलेले अडसरे हे शिवसेना, मनसे व भाजपामार्गे पुन्हा कॉँग्रेसमध्ये गेले. परंतु तेथेही त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली.

 

Web Title: Igatpuri, Trivambak retains the grip of army and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.