शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

इगतपुरी रिव्हेन्यू संघाने पटकावले अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:43 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु. येथे एच. के. रायडर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या टाकेद खेड गट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इगतपुरीच्या रिव्हेन्यू संघाने विजय मिळविला.

ठळक मुद्देटाकेद आमदार चषक : क्रिकेट स्पर्धेत २० संघ सहभागी

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद बु. येथे एच. के. रायडर्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या टाकेद खेड गट आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इगतपुरीच्या रिव्हेन्यू संघाने विजय मिळविला.गेल्या वीस दिवसांपासून टाकेद तीर्थावर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे सामने रंगले होते. सामन्यांमध्ये एकूण ३० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेला पंच म्हणून गणेश रोंगटे, अमृता भांगरे यांनी काम पाहिले, तर हभप अशोक भारती, किरण साबळे, नवनाथ साबळे यांनी कॉमेंट्री करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, इगतपुरी पंचायत समिती माजी उपसभापती उपसभापती पांडुरंग वारुंगसे, गटनेते वसंत भोसले, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, गजानन मित्रमंडळ अध्यक्ष विनोद कडू, टाकेद ग्रामपंचायत सदस्य विक्रम भांगे आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी इगतपुरी तालुका तालीम संघ उपाध्यक्ष भगवान जुंदरे, टाकेद बु.च्या सरपंच ताराबाई रतन बांबळे, वासाळी ग्रामपंचायतचे सरपंच काशीनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नथू पिचड, संदीप झनकर, नवनाथ साबळे, नवनाथ लहंगे, बाळू बरे यांचे सहकार्य लाभले. टाकेद तीर्थ संस्थानचे महंत किशोरदास श्रीवैष्णव यांनी या स्पर्धेला तीर्थ मैदान उपलब्ध करून दिले.विजेत्यांना रोख पारितोषिकेस्पर्धेतील विजेत्या संघास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक इगतपुरी रेव्हेन्यू संघाला देण्यात आले, तर द्वितीय ३१ हजार रुपये पारितोषिक एच रायडर्स संघ भंडारदरा वाडी टाकेद, तृतीय एकवीस हजार रुपयांचे पारितोषिक घोटी संघ, चतुर्थ ११ हजार रुपयांचे पारितोषिक भरवीर क्रिकेट संघास देण्यात आले. 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीStudentविद्यार्थी