शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीला रेलरोको,सिन्नरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:51 IST

देशव्यापी संप : विविध मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देसीआयटीयुच्यावतीने इगतपुरी रेल्वे स्थानकावर मुंबई-लखनौ पुष्पक एक्सप्रेस अडविण्यात आली.

नाशिक : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीआयटीयुच्यावतीने इगतपुरी रेल्वे स्थानकावर मुंबई-लखनौ पुष्पक एक्सप्रेस अडविण्यात आली. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणा करत रेलरोको आंदोलन केले. त्याचबरोबर सिन्नर येथेही सीआयटीयुच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.इगतपुरी येथे सीआयटीयुचे जिल्हानेते देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली रेलरोको आंदोलन करण्यात येऊन कामगारांच्या मागणीचे निवेदन स्टेशन मास्टर प्रेमचंद आर्या यांना देण्यात आले. यावेळी इगतपुरी रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. स्टेशन मास्तर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील गोंदे येथील मोनीयार रु फिंग कंपनी व वाडीवºहे येथील कंपनीतील कमी केलेल्या कामगारांना मागील भरपाईसह कामावर घेण्यात यावे, ज्योती ट्रक्चर कंपनीतील पाच महिने थकलेला पगार देऊन बंद पडलेली कंपनी त्वरीत सुरू करावी तसेच सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, शेतकर्याच्या शेतीमालाला हमी भाव देऊन संपूर्ण कर्जमाफी मिळावी, वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अमंलबजावणी करून अपात्र केलेले दावे पात्र करून जमीन कसणाऱ्यांच्या नावे प्लॉट करण्यात यावे, रेल्वे विमा व संरक्षण या सारख्या महत्वाच्या क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुक परवानगी देणे बंद करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. सीआयटीयुच्यावतीने सिन्नर येथेही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन