चौकट-
पोटविकाराची प्रमुख कारणे
जंक फूड, अधिक मसालेदार अन्न किंवा शिळे अन्न खाणे ही पोटविकाराची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव किंवा कमी व्यायाम, रात्री उशिरापर्यंत जागरण, ड्रिंक्स, स्मोकिंग, कोल्ड्रिंक्स यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पचनक्रिया बिघडून पोटाचे वेगवेगळे विकार जडतात.
चौकट-
पोटविकार टाळायचे असतील तर...
आपल्याला पोटाचे विकार जडू नये असे वाटत असेल तर वेळेवर जेवण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जेवणात हिरव्या पालेभाज्या, किमान एक फळ असायलाच हवे. मुख्य म्हणजे बाहेरचे जंक फूड पुर्णपणे बंद करायला हवे. याबरोबरच दररोज किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
कोट-
टीव्ही बघता बघता जेवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे आपले जेवणाकडे लक्ष कमी असते. जेवणास घरातील सर्व बसलेले असले तरी टीव्हीमुळे परस्परांमध्ये संवाद होत नाही. कारण सर्वांचेच लक्ष टीव्हीकडे असते. पोटाचे विकार टाळण्यासाठी जंक फूड पूर्णपणे टाळायला हवे. - डॉ. हर्षद महात्मे
कोट-
हल्ली लोक टीव्हीपेक्षा मोबाईल पाहत पाहत जेवत असतात ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे आपले जेवणाकडे लक्ष राहत नाही. आपण नेमके काय खातो आणि किती खातो हे समजत नाही. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. पचनसंस्था व्यवस्थित काम करत नसल्याने पोटाचे विकार जडतात. याशिवाय यामुळे फॅमिली बॅन्डिंग राहत नाही. - डॉ. अद्वय आहेर
चौकट-
मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही
कोट-
माझ्या मुलाची दूध न पिण्याचे किंवा न खाण्याचे अनेक बहाणे असतात. पण टीव्हीवर कार्टून सुरू करून दिले तर थोडाफार शांत बसून त्या नादात दूधही पितो आणि जेवणही चांगले करतो. असा माझा अनुभव आहे. - वैशाली अहिरे, गृहिणी
कोट-
मुलांना अमुक भाजी नकाे, किंवा अमुक एक पदार्थच हवा असा हट्ट धरला जातो यामुळे त्यांचे जेवण होत नाही. टीव्हीवर जर त्यांच्या आवडीचा कार्यक्रम सुरू असला तर आपण कोणतीही भाजी दिली तरी ती ते मुकाट्याने खातात. यामुळे सर्वच भाज्या पोटात जाण्यास मदत होते. - रेणुका परदेशी, गृहिणी
कोट-
टीव्ही बघता बघता जेवण करणे चुकीचे असले तरी मुलांना नादी लावायला आणि वेळच्या वेळी खाऊ घालणे त्यामुळे सोपे जाते. काहीवेळा मोबाईलवर एखादा गेम सुरू करून दिला तरी तो खेळता खेळता त्यांचे जेवण होते. - प्रिया साळवे, गृहिणी