शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

मद्यपी आढळल्यास ११ हजारांचा दंड

By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST

मद्यपी आढळल्यास ११ हजारांचा दंड

 

राजेश पवार

भऊरग्रामीण भागात ‘गाव करील ते राव काय करील?’ अशी एक म्हण अस्तित्वात आहे. भऊर (ता. देवळा) या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेच्या माध्यमातून संपूर्ण गाव परिसरात दारूबंदीचा निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे.गावात कित्येक वर्षांपासून संपूर्ण परिसरात दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत होती. गावातील सामाजिक कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु त्यांना त्यात यश येत नव्हते. शेवटी ग्रामपंचायत व तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून हनुमान मंदिराच्या आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव परिसरात संपूर्ण दारूबंदीचा ठराव करून निर्णय घेण्यात आला.भऊर गावात मद्यपी आढळल्यास सुमारे ११ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येऊन मद्यनिर्मिती व विक्री करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. परिसरात दिवसेंदिवस मद्यपींची संख्या वाढून सर्वसाधारणांसह तरुण पिढीही मद्याकडे आकर्षित होऊन संपूर्ण कुटुंबासह तरुण पिढीचे शारीरिक, मानसिक आरोग्य धोक्यात येऊन त्यांचे नुकसान होत होते. गत चार ते पाच वर्षांपासून दारूनिर्मिती व विक्रीबाबत भरून परिसरातून नाराजी व्यक्त होऊन दारूबंदीची मागणी होत होती. परंतु त्यासाठी सर्वांकडून प्रयत्न केले जात नव्हते. सध्या दारूच्या व्यसनामुळे शेतकरी कुटुंबाचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यामुळे संपूर्ण गावाने एकत्र येऊन विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा निर्णय घेतला. गावातील ज्येष्ठ नागरिक कारभारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली.ग्रामसभेस उपसरपंच कडू पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पवार, काशीनाथ पवार, रणजीत पवार, मोहन पवार, दादाजी पवार, काकाजी पवार, उमेश पवार, प्रकाश पवार, जयवंत पवार आदिंसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सोसायटी सदस्य, ग्रामस्थांसह महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.