शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट, सिटबेल्ट नसल्यास आता दररोज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:13 IST

दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहरात ‘स्पेशल हेल्मेट ड्राइव्ह’ राबविण्यात आला़

ठळक मुद्देतपासणी मोहीम : वाहतूक नियमांचे उल्लंघन, अकरा लाखांची दंडवसुली

शहरातील सुरू असलेली हेल्मेट तपासणी मोहीम़नाशिक : दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहरात ‘स्पेशल हेल्मेट ड्राइव्ह’ राबविण्यात आला़ यामध्ये हजारो दुचाकी वाहनांची तपासणी करून हेल्मेट परिधान न करणाºया दोन हजार १८९ वाहनधारकांकडून दहा लाख ९४ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती साधारण वर्षभरापूर्वीच लागू करण्यात आली असून, येत्या जानेवारीपासून पुणे शहरातही लागू केली जाणार आहे़ हेल्मेटमुळे अनेक गंभीर अपघातातही चालकाचे प्राण वाचले आहेत़ मात्र, असे असूनही हेल्मेट वापराबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील १३ पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते़ शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी तसेच कर्मचारी तर शहर वाहतुकीच्या चारही विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते़महिनाभरातीलतीन ‘ड्राइव्ह’मध्येसुमारे ३९ लाखांचा दंड वसूलशहर पोलिसांनी १६ व १७ नोव्हेंबर असे दोन दिवस हेल्मेट तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती़ या दोन दिवसांमध्ये ४५ हजार वाहनांची तपासणी करून २८ लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला होता़, तर शनिवारी (दि़१५) शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट तपासणी मोहिमेत १० लाख ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ एकूण तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत दुचाकीचालकांकडून ३९ लाख ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़४वाहतूक नियमांचे पालन तसेच हेल्मेट, सिटबेल्ट यांचा स्वत:च्याच सुरक्षिततेसाठी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़ दरम्यान, यापुढे दररोज विनाहेल्मेट व सिटबेल्ट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़ (आणखी वृत्त पान / २)

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस