शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पेठरोडवरून जाताय, तर मग सावध रहा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:06 IST

दोघा लूटारूंनी एका पादचाऱ्याला पेठरोडवर चक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा या भागात लागोपाठ जबरी लूटीच्या घटना

नाशिक : मिरची पूड डोळ्यांत फेकून, तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूटीच्या घटना पंचवटी परिसरात सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्येही भीती व्यक्त होत आहे. तसेच सरकारी मालमत्ताही चोरट्यांनी लक्ष्य केली असून एकूणच पंचवटी परिसरात पोलिसांचा वचक कमी झाला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिक्षातून आलेल्या दोघा लूटारूंनी एका पादचाऱ्याला पेठरोडवर चक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पेठरोड शनी मंदिरमागे राहणारे गणेश धंदुके हे सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास पेठरोडवरून पायी जात असताना एका रिक्षातून फुलेनगरमधील संशयित आरोपी काळू उर्फ संदेश सुधाकर पगारे, युवराज सावळीराम गायकवाड या दोघांनी रिक्षातून येऊन शिवीगाळ करत गणेश यांना रस्त्यात अडवून तलवारीचा धाक दाखविला. यावेळी त्यांच्या खिशातून ओप्पो कंपनीचा मोबाइल व अकराशे रु पयांची रोकड बळजबरीने काढून घेतली आणि ‘आमच्याविरु द्ध पोलिसांकडे तक्र ार केली तर तुला जीवंत सोडणार नाही’ असा दमदेखील भरल्याचे त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. धंदुके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपुर्वीच कर्णनगर परिसरातील रहिवाशी असलेले सुनील पवार यांना अशाचप्रकारे डोळ्यां मिरचीपूड फेकून एका टोळक्याने पेठरोडवरच लूटले होते. त्यांना जबर मारहाण देखील केल्याने जिल्हा शासकिय रूग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातदेखील संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहे; मात्र अद्याप पोलिसांकडून त्यांच्या मुसक्या बांधल्या जात नसल्याने पुन्हा पेठरोडवरच पादचाºयास थेट तलवारीचा दाख दाखवून लूटण्यापर्यंत मजल वाढल्याचे बोलले जात आहे.--इन्फो--पेठरोडवरून जाताय, सावधान....!पेठरोडवरून सकाळी किंवा सायंकाळी जाताय, तर मग सावध रहा...., असे म्हणण्याची वेळ आता पंचवटीकरांवर आली आहे. कारण सातत्याने लागोपाठ जबरी लूटीच्या घटना या भागात घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. जबरी लूट करणारे हल्लेखोर हे अज्ञात नसून त्यांची नावेदेखील फिर्यादींकडून उघड करण्यात आली आहेत; मात्र अद्याप त्यांना बेड्या ठोकण्यास पंचवटी पोलिसांना यश आलेले नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी