शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१६ तासांत ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास रुग्ण स्थलांतरास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:48 IST

नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात सध्या ऑक्सिजनची आणीबाणी जाणवत असून, साठा संपू लागल्यास खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजन संपला आहे. तातडीने काहीतरी करा; अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या, अशी मागणी करतात. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे महापालिकेने असे प्रकार टाळण्यासाठी नियोजन केले असून, चोवीस तास अगोदर पुरवठादाराकडे मागणी नोंदवावी आणि सोळा ताासांत पुरवठा न झाल्यास महापालिकेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

ठळक मुद्दे शहरात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत

नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात सध्या ऑक्सिजनची आणीबाणी जाणवत असून, साठा संपू लागल्यास खासगी रुग्णालयांकडून ऑक्सिजन संपला आहे. तातडीने काहीतरी करा; अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या, अशी मागणी करतात. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे महापालिकेने असे प्रकार टाळण्यासाठी नियोजन केले असून, चोवीस तास अगोदर पुरवठादाराकडे मागणी नोंदवावी आणि सोळा ताासांत पुरवठा न झाल्यास महापालिकेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन संपणार असल्याचे स्पष्ट होऊ लागताच, रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधितांना परत नेण्यास सांगितले जाते. तसेच महापालिकेकडेही रुग्ण स्थलांतरासाठी परवानगी मागितली जाते. ही आणीबाणी टाळण्यासाठी आता महापालिकेने ऑक्सिजन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली असून, तिचा दूरध्वनी क्रमांक ०२५३- २२२०८०० व नाशिक जिल्हा मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षाचा ९४०५८६९९४० असा आहे. मात्र नियोजनाचा भाग म्हणून खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी त्यांच्या संबंधित ऑक्सिजन पुरवठादाराकडे किमान २४ तास किंवा त्यांच्या पुरवठादाराशी असलेल्या करारनाम्याप्रमाणे नोंदवावी, तद्नंतर सोळा तासांत पुरवठा न झाल्यास महानगरपालिकेच्या ऑक्सिजन हेल्पलाइनला रुग्णालयांनी संपर्क साधावा. त्यानुसार हेल्पलाइनतर्फे ऑक्सिजन पुरवठाधारकास ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले जाईल, तसेच याबाबत जिल्हा ऑक्सिजन हेल्पलाइन कक्षास माहिती दिली जाईल. पुरवठादाराकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्यास अप्पर जिल्हाधिकारी यांचे संनियंत्रणातील मेडिकल ऑक्सिजन नियंत्रण कक्षास कळवण्यात येईल. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर करण्यास मदत होणार आहेऑक्सिजन ऑडिट सक्तीचेमनपाच्या वतीने सर्व खासगी रुग्णालय व्यवस्थापकांनी त्यांचे रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करून घेण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. रुग्णालयामधील ऑक्सिजनची गळती तसेच ऑक्सिजन यंत्रणांमधील विविध सामग्री यांची देखभाल-दुरुस्ती याबाबत प्रमाणपत्र अहवाल सर्व रुग्णालय व्यवस्थापकांनी मनपास सादर करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे‍.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटल