शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री कडू यांनी माफी न मागितल्यास आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 16:23 IST

आमचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, दिव्यांग कन्येशी लग्न करायला समाजातील कुणीच मुलगा नाही, हा मुलीच्या वडिलांचा दावा चुकीचा होता. त्यांनी चर्चा केली असती तर मुलीसाठी समाजातील शंभर मुले विवाहासाठी दाखवली असती.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून कडू यांचा निषेध करण्याचे आवाहनराज्यव्यापी बंद पुकारून आमची ताकद दाखवून देऊ

नाशिक : आंतरधर्मीय विवाहाला पाठबळ पुरवून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एका पदाधिकाऱ्याचे ह्दयविकाराच्याधक्क्याने निधन झाले आहे. तसेच संपूर्ण सुवर्णकार समाजात या घटनेने असंतोष पसरण्यासह समाजभावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातराज्यमंत्री कडू यांनी समाजाची ३० जुलैच्या आत जाहीर माफी न मागितल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गजू घोडके यांनी दिला आहे.राज्यमंत्री कडू यांनी ह्यकोण लग्न रोखतो ते मी पाहतो, मी लग्नात येऊन नाचणार असे आव्हान देऊन एकप्रकारे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे आता समाजाचे समाधान होईपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचेही घोडके यांनी जाहीर केले. संपूर्ण समाजाला डावलून एकतर्फी निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असा सवालदेखील घोडके यांनी केला आहे.

आमचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, दिव्यांग कन्येशी लग्न करायला समाजातील कुणीच मुलगा नाही, हा मुलीच्या वडिलांचा दावा चुकीचा होता. त्यांनी चर्चा केली असती तर मुलीसाठी समाजातील शंभर मुले विवाहासाठी दाखवली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर कडूंनी विनाकारणच प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यामुळे राज्यभरातील समाजबांधवांनी काळ्या फिती लावून कडू यांचा निषेध करण्याचे आवाहनदेखील घोडके यांनी केले. तसेच दरम्यानच्या काळात आमदार कपिल पाटील यांनीदेखील मुलीच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचे समर्थन केले.त्यामुळे आमदार पाटील यांनीदेखील समाजाची माफी मागावी, अशी मागणीही घोडके यांनी केली. आम्ही व्यापारी समाजातील माणसे आहोत. मात्र, समाजाविरुद्ध कुणी वक्तव्य करणार असतील, तर राज्यव्यापी बंद पुकारून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही घोडके यांनी दिला आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूNashikनाशिकmarriageलग्नMuslimमुस्लीम