शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब असते तर अमित शहा पटक देंगे म्हणू शकले नसते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:39 IST

शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट बघून शिवसेनेतील आठवणींना उजाळा देताना ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देछगन भुजबळ : शिवसेनेवर उधळली स्तुतिसुमने

नाशिक : शिवसेनेचा तो काळ वेगळा होता. शिवसेनाप्रमुख आज असते तर भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा वगैरेंसारखे जे लोक आहेत ते पटक देंगे वगैरे म्हणू शकले नसते, असे मत राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट बघून शिवसेनेतील आठवणींना उजाळा देताना ते पत्रकारांशी बोलत होते.ऐन सार्वत्रिक निवडणुकीचा काळ, त्यामुळे राजकीय वातावरण तप्त असतानाच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या चित्रपटगृहात ठाकरे चित्रपटाचा खेळ घेऊन चर्चेला उधाण आणले. स्वत: भुजबळ यांनी चित्रपट बघितला आणि भूतकाळ जागविला. शिवसेनेची त्यावेळी असलेली आक्रमकता आणि आताची स्थिती या विषयावर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी ते दिवस वेगळे होते, ती माणसे वेगळी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या काळात अमित शहा वगैरेंसारखे पटक देंगे म्हणू शकले नसते, असे त्यांनी सांगितले; परंतु त्याचबरोबर त्यांनी सध्या शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. भुजबळ यांनी शिवसेना तळागाळात असल्याने ती संपणे शक्य नसल्याचे सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी माहिती नाही किंवा प्रत्यक्ष बघितलेले नाही, अशा अनेक घटनांना उजाळा मिळाल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या चित्रपटात नारायण राणे किंवा स्वत: भुजबळ यांच्या विषयीचा उल्लेख नसल्याचे विचारल्यानंतर चित्रपट ठाकरेंवर आहे, भुजबळ किंवा राणेंवर नाही. बाळासाहेबांचे जीवन चरित्रच इतके मोठे आहे की, त्यात एक चित्रपट नाही तर असे सात-आठ चित्रपट काढावे लागतील, असेही भुजबळ म्हणाले.यावेळी समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड, अ‍ॅड. रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, शाहू खैरे, विश्वास ठाकूर यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.पंतप्रधानपदासाठी पवारांना सेनेचा पाठिंबा शक्यशरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचे चित्रपटात नमूद असून, त्याबाबत विचारणा केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेने नेहमीच पाठिंबा देऊन मराठी माणसाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमचे खासदार कमी असल्याने पंतप्रधान होणे शक्य नसल्याचे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले आहे. परंतु कर्मधर्मसंयोगाने तशी वेळ आलीच तर शिवसेना पाठिंबा देईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन