शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना काही झाले तर सरकार जबाबदार;शरद पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:08 IST

गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र‘जामीन हा नियम आहे आणि तुरूंग हा अपवाद आहे’ हे तत्व छगन भुजबळ यानाही लागू

नाशिक : राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले असून, भुजबळ यांच्यावर योग्य उपचार व्हावेत अन्यथा काही अप्रिय घडले तर सरकारलाच जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.या संदर्भातील पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही निर्णय झालेला नाही. न्यायालयाकडून त्यांच्या बाबतीत अंतीम निर्णय येत नाही तो पर्यंत त्यांना निर्दोष समजण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असे म्हटले आहे की, ‘जामीन हा नियम आहे आणि तुरूंग हा अपवाद आहे’ हे तत्व छगन भुजबळ यानाही लागू होते. त्यांना वारंवार नाकारण्यात येत असलेला जामीन दुर्देवी आहे. मला त्यावर काहीही वक्तव्य करायचे नाही. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे सामाजिक जीवनात घातली आहेत. त्यांनी मुंबईचे महापौर, महाराष्टÑाचे उपमुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम अशी पदे भुषविली आहेत. त्यांनी महाराष्टÑाच्या जनतेच्या कल्याणासाठी दिलेले योगदान अव्हेरता येणार नाही. मला जास्त काही अपेक्षा नाही पण योग्य ते वैद्यकीय उपचार त्यांना दिले गेले पाहिजेत, तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यांच्या प्रकृती विषयी आणि वाढत्या वयाविषयी तुम्ही ज्ञात आहात. मला खात्री आहे की तुम्ही त्यांना योग्य वैद्यकीय उपचार भेटावेत यादृष्टीने पावले उचलाल. मला हे खेदाने म्हणावे लागत आहे की, येत्या काळात जर छगन भुजबळ यांना एखाद्या अप्रिय परिस्थितीतून जावे लागले तर तुमच्या सरकारला यासाठी जबाबदार धरले जाईल.शरद पवार यांनी गुरूवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेले हे पत्र शनिवारी सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच दिवशी नाशिक येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक