शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत कारवाई झाल्यास सेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:46 IST

सिडकोने त्यांच्या ताब्यातील सहाही योजना या महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्या असून, हस्तांतरणानंतरच्याच अतिक्रमणाचा मनपाने विचार केला पाहिजे. त्यापूर्वीच्या सर्व घरांच्या बांधकामास सिडकोने परवानगी दिलेली आहे, ही बांधकामे पाडण्याचा मनपाने प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल.

सिडको : सिडकोने त्यांच्या ताब्यातील सहाही योजना या महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्या असून, हस्तांतरणानंतरच्याच अतिक्रमणाचा मनपाने विचार केला पाहिजे. त्यापूर्वीच्या सर्व घरांच्या बांधकामास सिडकोने परवानगी दिलेली आहे, ही बांधकामे पाडण्याचा मनपाने प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. सह्याद्रीनगर येथील भूखंड हा शिवसेना कार्यालयासाठीच खरेदी केला असल्याची माहिती शिवसेना पश्चिम विधानसभा संपर्क प्रमुख नीलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.  सिडकोच्या विविध प्रश्नासंदर्भात चव्हाण यांनी सांगितले की, सिडकोने नाशिक शहरात सहा योजना उभारल्या आहेत. या योजना उभारून त्यांची देखभाल मनपाने केली असली तरी सिडको हे मागील वर्षीच महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या बांधकामाविषयी आयुक्तांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. सिडकोने परवानगी दिल्यानेच नागरिकांनी हे बांधकाम केले आहे. सिडकोतील प्रत्येक नागरिक घरपट्टी भरत असून, ही घरपट्टी मनपाने नागरिकांना केलेल्या बांधकामाचे मोजमाप करून दिली असल्याने हे क्षेत्र किंवा बांधकाम मनपास मान्य असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. आयुक्तांनी मोहिमेला सुरु वात करावी, शिवसेना त्यांना जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिकेचे अधिकारी रवींद्र पाटील हे चिठ्ठी लिहून घरातून निघून गेले असून, त्यांचा अद्याप तपास लागत नसून त्यांच्यावर ही परिस्थिती आयुक्तांनीच आणली आहे. त्यामुळे आयुक्तांवरच या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सिडकोची अतिक्र मण मोहीम स्थगित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदारांनी केला आहे. भाजपाच्या आदेशानेच हे रेखांकन सुरू करण्यात आले आहे. सह्याद्रीनगर येथील भूखंडावर असलेले शिवसेनेचे कार्यालय अतिक्र मण मोहिमेत काढण्यात आले असले तरी या भूखंडावर शिवसेनेचे संपर्क कार्यालयच उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनीही पक्षाच्या कार्यालयासाठीच हा प्लॉट घेतला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका