शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:56 IST

नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

सिन्नर : नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.  देवनदी पुनरुज्जीवन व एकात्मिक उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय सहविचार सभेत ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, टाटा ट्रस्टचे मुकुल गुप्ते, अशोक कुमार, नगराध्यक्ष किरण डगळे, युवानेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, नालंदा फाउण्डेशनचे संजय जोशी, नेचर कॉन्झर्व्हेनसचे रॅनी थॉमस, युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे आदी उपस्थित होते. सिन्नरमध्ये झालेले काम जिल्ह्यातील इतरही तालुक्यात व्हावे यासाठी युवामित्र-टाटा ट्रस्टने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. मालेगाव, नाशिक, चांदवड, कळवण, नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा, सटाणा या तालुक्यातील ब्रिटिशकालीन २७२ बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन व त्यावरील वितरण व्यवस्था तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. आमदार वाजे यांनी निधी उपलब्ध केल्याप्रमाणे इतरही तालुक्यातील आमदार, खासदारांचा स्वनिधी, जिल्हा नियोजनमार्फत निधी उपलब्ध करण्यात येईल. टाटा ट्रस्ट, युवामित्रने हे काम एक हजार गावांपर्यंत न्यावे. शास्वत शेतीसाठी मदत करण्यास सदैव तयार असल्याचे ते म्हणाले.  जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात नदी पुनरुज्जीवनाचे काम व्हावे यासाठी त्या त्या गटातील सदस्याच्या माध्यमातून सेस निधीमार्फत कामे केली जातील. त्याद्वारे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. लहानू भाबड, बापू खैरनार (मालेगाव), सुनील गडाख, अशोक कुमार, डॉ. संजय बेलसरे यांनी मनोगत व्यक्त केले. सहविचार सभेस कोल्हापूर, रायगड, नगर आदी जिल्ह्यासह मालेगाव, बागलाण, दिंडोरी, कळवण, दिंडोरी आदी तालुक्यातील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी प्रास्ताविक केले.शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भरसिन्नरला सरस्वती नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी शहराचे पाणी देवनदीत मिसळून ती प्रदूषित होणार नाही यावर पुढील काळात काम केले जाणार असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. सांडपाणी व्यवस्था व नदी प्रदूषण ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. तथापि, आपली समस्या आपणच सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भर असला पाहिजे. त्यातून आजारपणाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत वाजे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी