एकीकडे नाशिक शहरामध्ये एकापेक्षा एक गगनचुंबी इमारतींचे ‘इमले’ उभे राहत असून, शेतजमिनींमधूनही ‘सोनं’ पिकायला लागलं आहे. दुसरीकडे मात्र काबाडकष्ट गरीब महिलांच्या पाचवीलाच पुजलेले. आपल्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रणरणत्या उन्हात दिवसभर घाम गाळून तान्हुल्याला कमरेवर घेत, चंद्रमौळीमधील संध्याकाळची चूल पेटविण्याच्या आशेने डोक्यावर मोळी घेऊन मावळत्या दिनकराला नमन करीत निघालेल्या या मजूर महिलांचे ग्रामीण परिसरात जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला टिपलेले हे छायाचित्र.
माझ्या चंद्रमौळीतही पेटते चूल...
By admin | Updated: March 8, 2015 01:43 IST