नाशिक : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारादिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुटीत निवडणुका, रमजान पर्व आल्यामुळे बडी दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.जुन्या नाशिकमधील पिंजारघाट येथील हुसेनी बाबा यांच्या बडी दर्ग्याच्या परिसरात सायंकाळी उरूस भरत आहेत. गुरुवारी (दि.१३) भाविकांची यात्रेत गर्दी झाली होती. यात्रेत सहभागी होताना भाविकांनी कापडी चादरऐवजी फुलांच्या चादरी मजारशरीफवर अर्पण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन विश्वस्तांकडून करण्यात आले आहे. कापडी चादरवरील अनावश्यक खर्च भाविकांना टाळावा, त्याऐवजी गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा, हा यामागील उद्देश्य असल्याने विश्वस्तांनी सांगितले.जुने नाशिकसह शहर व परिसरातील मित्रमंडळांनी संदलच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात बडी दर्गाच्या आवारात आणू नये. त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने डोक्यावर चादर, प्रसादाचे ताट ठेवून दरुदोसलाम, नात-ए-रसूल, मनकबतचे पठण करत यावे. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा बेशिस्तपणा यात्रेत होणार नाही, असे विश्वस्तांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यात्रोत्सवाची सांगता रविवारी (दि.२३) होणार आहे.भद्रकाली पोलिसांकडून चादर अर्पणसालाबादप्रमाणे यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहिली चादर बडी दर्ग्यामधील मजारवर चढविण्याचा मान वर्षानुवर्षांपासून भद्रकाली पोलिसांना दिला जातो. पोलिसांकडून विधिवत डफलीच्या निनादाने मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीत पारंपरिक पद्धतीने कव्वाली, नातचे पठण करण्यासाठी ‘मिलाद पार्टी’ला सहभागी करून घेण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून बाबांच्या मजारवर चादर अर्पण केली.
हुसेनी बाबा यांचा उरूस सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:31 IST
सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारादिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुटीत निवडणुका, रमजान पर्व आल्यामुळे बडी दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून उरूस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हुसेनी बाबा यांचा उरूस सुरू
ठळक मुद्दे२३ रोजी समारोप : निवडणूक, रमजान पर्वामुळे विलंब