शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सदस्याच्या पतीचा समितीच्या कामकाजात हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:15 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी होवू देऊ नये, अशी मागणी करून संतप्त झालेल्या महिला सदस्याने सभात्याग करीत थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडे झेरॉक्स सदस्याबाबत तक्रार केली. सुमारे अर्धातासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या वादाची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत झडली.

ठळक मुद्देशिक्षण समितीत वाद : झेरॉक्स सदस्याविरुद्ध तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या मासिक सभेत समिती सदस्य महिलेऐवजी त्यांच्या पती महाशयांनीच विषय मांडून चर्चेत सक्रिय सहभाग घेतल्यावरून वाद होऊन जोरदार खडाजंगी झाली. महिला सदस्याच्या पतीचा बैठकीशी काहीही संबंध नसताना त्यांना चर्चेत सहभागी होवू देऊ नये, अशी मागणी करून संतप्त झालेल्या महिला सदस्याने सभात्याग करीत थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडे झेरॉक्स सदस्याबाबत तक्रार केली. सुमारे अर्धातासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या वादाची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत झडली.शिक्षण समितीची सूत्रे स्वीकारल्यानंतर सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलीच मासिक सभा गुरुवारी सकाळी घेण्यात आली. बैठकीतील नियमित विषयांना सुरुवात झाल्यानंतर समिती सदस्य सुनीता पठाडे यांचे पती मच्छिंद्र पठाडे यांनी बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन शिक्षण क्षेत्राविषयी विषय मांडून चर्चा सुरू केली. बऱ्याच वेळ त्यांनी शाळा, शिक्षक आदी विषयांवर चर्चा सुरू ठेवल्याने त्यांच्या या हस्तक्षेपाला राष्टÑवादीच्या सदस्य नूतन आहेर यांनी हरकत घेतली. महिला सदस्य सुनीता पठाडे बैठकीत हजर असताना त्यांच्याऐवजी पती पठाडे हे कोणत्या अधिकारान्वये विषय मांडत आहेत? असा प्रश्न आहेर यांनी उपस्थित केला. मच्छिंद्र पठाडे यांना सभापतींशी चर्चा करायची असेल तर बैठकीनंतर करावी, असे आहेर यांनी सांगितल्यावर पठाडे पती-पत्नीने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. क्षीरसागर यांनी या संदर्भात सभापतींशी आपण बोलू असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर नूतन आहेर यांनी पुन्हा शिक्षण समितीच्या कामकाजात भाग घेऊन मच्छिंद्र पठाडे यांनी समितीच्या सभेत मांडलेल्या मुद्द्यांची इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. परंतु सभापती दराडे यांनी नकार दिला. या सभेत आहेर यांनी शाळा दुरुस्ती तातडीने करण्यात यावी तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पेन व वही नीट हाताळता येत नसल्याने विद्यार्थ्यांना पाटी वापरण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. समितीच्या सभेत बेकायदेशीरपणे काम होत असल्याची तक्रार करून जोपर्यंत पठाडे बसतील तोपर्यंत आपण समितीच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे सांगून आहेर यांनी सभात्याग केला व थेट अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली. महिला सदस्यांचे पती जिल्हा परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असतील तर महिला आरक्षणाचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक