शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सोडून प्रेयसीसोबत राहणाऱ्या पतीस चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 00:25 IST

नांदगांव : लग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन आणि ते टिकून राहण्यासाठी वटपूजनातून जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना सौभाग्यवतींकडून केली जाते, परंतु सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या पत्नीचा आयुष्यभर सांभाळ करेल, अशी शपथ घेणाऱ्या पतीकडून मात्र शपथभंग केला जातो, तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. अशीच एक घटना नांदगाव तालुक्यातील दर्हेल गावी घडली. पत्नीला धोका देऊन प्रेयसीसोबत पलायन करणाऱ्या आणि नंतर रंगेहाथ सापडलेल्या पतीला पत्नीने चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले. आता हे प्रकरण कोर्टाची पायरी चढण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देदर्हेल गावची घटना : प्रकरण पोलिसात, पतीराजाचा ताठा कायम

नांदगांव : लग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन आणि ते टिकून राहण्यासाठी वटपूजनातून जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना सौभाग्यवतींकडून केली जाते, परंतु सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या पत्नीचा आयुष्यभर सांभाळ करेल, अशी शपथ घेणाऱ्या पतीकडून मात्र शपथभंग केला जातो, तेव्हा तो चर्चेचा विषय बनतो. अशीच एक घटना नांदगाव तालुक्यातील दर्हेल गावी घडली. पत्नीला धोका देऊन प्रेयसीसोबत पलायन करणाऱ्या आणि नंतर रंगेहाथ सापडलेल्या पतीला पत्नीने चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले. आता हे प्रकरण कोर्टाची पायरी चढण्याच्या तयारीत आहे.त्याचे झाले असे, दर्हेले येथे लग्नानंतर अडीच वर्षे कसाबसा संसार करणाऱ्या पत्नीला पती नीट वागवत नाही, नीट कामधंदा करीत नाही, म्हणून कुटुंबातील लोकांनी वेगळे काढून दिले. पती महोदयांनी स्वत:च्या जमिनीतून काही जमीन विकली आणि हाती पैसे खुळखुळू लागल्यानंतर चंगळवाद सुरू झाला. पतीराजाचे त्यातूनच एका मुलीशी प्रेमसंबध जुळले आणि घरात पत्नीशी खटके उडायला सुरुवात झाली. पत्नीने गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित यांना एकत्र जमवून बऱ्याचदा पतीला समजावण्याचा प्रयत्नही केला. पत्नी असताना प्रेयसीचा नाद सोड, म्हणून गावकऱ्यांनीही समजूत काढली, परंतु प्रेमात बुडालेल्या पतीराजाच्या ध्यानात हे उपदेशाचे बोल काही रुजेनात. प्रेमात वेडापिसा झालेला व पैशांच्या गुर्मीत पत्नीला माहेरी पाठवून देत, पतीराजाने प्रेयसीला घेऊन गावातून पलायन केले. तीन महिने उलटून गेल्यानंतर पसार झालेला पती एक दिवस दर्हेल गावी स्वत:च्या घरात प्रेयसीसोबत राहत असल्याची खबर दि. २० फेब्रुवारी रोजी पत्नीला कळाली. पत्नीने आपल्या वडिलांना सोबत घेत, दर्हेल गाव गाठले आणि पतीला प्रेयसीसोबतच घरात रंगेहात पकडले. आपले बिंग फुटले, म्हणून पतीने घरातून पळ काढला, परंतु अखेर तो पत्नीच्या हाती लागला. त्याला यथेच्छ चोप देत, तिने पतीला पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दाखल केली.इन्फोवड पुजूनही गेली नाही खोडदर्हेल गावी सध्या याच प्रकरणाची चवीने चर्चा होत आहे. पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी व साता जन्माच्या गाठीसाठी वडपूजन केले, परंतु त्याची खोड काही गेली नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषत: गावातल्या महिलावर्गाने याबाबत संतप्त भावना व्यक्त करत, सदर इसमाला कायद्याने धडा शिकवावा, अशी मागणी केली.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी