शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:44 IST

पंचवटी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी फावडा मारत तिचा खून केल्यानंतर सुमारे ११ वर्षांपासून फरार असलेला तिचा पती ...

ठळक मुद्देअकरा वर्षांपूर्वी घडला होता गुन्हा : दिंडोरीतून पंचवटी पोलिसांनी बांधल्या मुसक्या

पंचवटी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी फावडा मारत तिचा खून केल्यानंतर सुमारे ११ वर्षांपासून फरार असलेला तिचा पती संशयित हल्लेखोर काशीनाथ बाळू पवार (६०) यास अखेर पंचवटी पोलिसांना बेड्या ठोकण्यास यश आले आहे. संशयिताबाबत कुठलेही ठोस पुरावे हाती नसताना केवळ गोपनीय माहितीवरून दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथून पवार याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.सय्यद पिंपरी रस्त्यावर आडगाव शिवारातील येथील एका शेतात मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या पवार दाम्पत्यामध्ये खटके उडाले. ११ ऑगस्ट २०१० रोजी दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. पवार मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे राहणारा असून तो पहिल्यापासून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी काम करायचा पोलिसांनी त्याच्या मूळ गावीदेखील त्याचा शोध घेतला असता पवार हा गावाकडे येतच नसल्याने कदाचित तो मृत झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात होती.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार गुन्हे शोधपथकाने काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे जाऊन संशोधनाबाबत विचारपूस केली असता पवार दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथे एका शेतात मोलमजुरी करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या केवळ नावावरून शोध घेतला असता तो डंबाळेवाडीत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ११ वर्षांपूर्वी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. पवार यास बुधवारी (दि.१२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी