शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पतीने आवळला पत्नीचा गळा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:47 IST

संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते.

ठळक मुद्देपोलिसांनी संशियत आरोपी पतीला अटक केली आहे.अकस्मात नोंद बदलून खूनाचा गुन्हा दाखल

नाशिक : किरकोळ कारणावरून पत्नीसोबत झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गोदाकाठावरील मरीमाता झोपडपट्टीत घडल्याचे मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली. खुनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशियत आरोपी पतीला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पती विजू केशव कामडी (३५) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विजू याने स्वत:ची पत्नी शिला कामडी (३०) हिचा गळा आवळून खून केल्याचे मयत शिलाच्या बहीण भारती विजय गजरे यांनी तक्र ारीत म्हटले आहे. संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीत वाद होऊन विजू याने शीलाचा कशाच्यातरी सहाय्याने गळा आवळून ठार केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मद्यपी विजूला ताब्यात घेतले आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत पुढील तपास करीत आहेत. शहरात या पाच दिवसांत चार खूनाच्या घटना घडल्या आहेत.गळा आवळल्यानंतर मेव्हणीकडे धावसंशयित विजू याने पत्नी शीलाचा गळा आवळून ठार मारल्यानंतर तिच्या शरिरिाची हालचाल बंद झाल्याचे पाहून त्याने जवळच राहणाऱ्या मेव्हणी भारतीकडे धाव घेत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी शीलाच्या घरी धाव घेत तीला उठविण्याचे प्रयत्न केले. ती शुध्दीवर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान,घटनास्थळी पोलीस बीटमार्शलने धाव घेत पाहणी केली. मृतदेह संशयास्पद नसल्याने सुरु वातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात पाठविला मंगळवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालात मयत महिलेचा गळा आवळल्याने खून श्वासोच्छवास थांबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर पोलिसांनी संशयित तिचा पती विजू यास चौकशीसाठी ताब्यात घेतले व अकस्मात नोंद बदलून खूनाचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनgodavariगोदावरी