ठळक मुद्देया दोघांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू होते
नाशिक : इंदिरानगर येथील शिल्पा देवीदास कोठावदे (३६) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यानंतर २४ तासांच्या आत त्यांचे पती देवीदास मधुकर कोठावदे (४३) यांचेही निधन झाले.
या दोघांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कोठावदे यांचे ते लहान बंधू होत.