शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा विनयभंग करून पतीला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:26 IST

दुचाकीवरून जात असताना बकरीला धक्का लागल्यानंतर शेळीपालन करणाऱ्याने औषधोपचारासाठी पैशांची मागणी करून दुचाकीवरील दाम्पत्यास जबर मारहाण केली तसेच महिलेचा विनयभंग केला. सदर घटना रविवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित सुनील दिलीप शिंदे (रा. अश्वमेधनगर, विठाईनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

नाशिक : दुचाकीवरून जात असताना बकरीला धक्का लागल्यानंतर शेळीपालन करणाऱ्याने औषधोपचारासाठी पैशांची मागणी करून दुचाकीवरील दाम्पत्यास जबर मारहाण केली तसेच महिलेचा विनयभंग केला. सदर घटना रविवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित सुनील दिलीप शिंदे (रा. अश्वमेधनगर, विठाईनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़  रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक दाम्पत्य पेठरोडने अश्वमेधनगरकडे आपल्या घरी जात होते़ यावेळी रस्त्यावरील सात-आठ शेळ्यांपैकी एक शेळी अचानक दुचाकीसमोर आल्याने धक्का लागला़ या घटनेनंतर संतप्त शेळीपालकाने या दाम्पत्याची दुचाकी अडवून शिवीगाळ करीत बकरीच्या नुकसानभरपाईची मागणी केली़ यानंतर आपल्या सहकाºयांना बोलावून या दाम्पत्यास बेदम मारहाण केली़ तर महिलेचे केस पकडून जमिनीवर पाडून तिचा विनयभंग केला़  संशयितांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्यास उपचारासाठी दिंडोरी रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले़ विशेष म्हणजे आपल्या सहकाºयांसमवेत दाम्पत्यास मारहाण करणारा संशयित शिंदे हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात आला होता़ यावेळी म्हसरूळ पोलिसांनी मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नातेवाइकांना वाद आपसात मिटवून घेण्याचा व टवाळखोरांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला़ परंतु, मारहाण झालेले दाम्पत्य फिर्याद दाखल करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी संशयित शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला़ दरम्यान, या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित शिंदेविरोधात मारहाण, शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा