शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नी ‘रेस्क्यू’ : ट्रेकिंगच्या थराराने रोमांच अन् उरात भरली धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:59 IST

पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष, सिडको अग्निशमन उपकेंद्राला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले.

ठळक मुद्देडोळे गरगरू लागल्याने चक्कर जाणवण्यास सुरूवात झाली.ट्रेकिंगच्या धराराने उरात धडकी भरली

नाशिक : रविवारची सुटी पांडवलेणीच्या निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करायची म्हणून अशोकामार्ग परिसरातील एक दाम्पत्याने सकाळी लेणी गाठली. लेणीवर पोहचल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवयाचा म्हणून या दाम्पत्याने नेहरू वनोद्यानाच्या बाजूने डोंगर सर करण्यास सुरूवात केली. डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यानंतर डोळे गरगरायला लागल्याने खाली उतरण्याच्या वाटही धूसर दिसू लागल्या अन् ट्रेकिंगच्या धराराने उरात धडकी भरली, मग मदतीचा टाहो त्यांनी फोडला. तासभर पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवून दोघांना सुखरूप खाली आणले.रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने शामकांत प्रभाकर पाटील (४६) व त्यांची पत्नी विद्या पाटील (३५,रा. मातोश्री बंगला, अशोका मार्ग) हे दोघे नातेवाईक व मित्रमंडळी सोबत पांडवलेणी येथील डोंगरावर सकाळी आठ वाजता फिरण्यासाठी आले होते. पाटील यांच्यासोबत असलेले नातेवाईक व मित्रमंडळी पांडवलेणी फिरून झाल्यावर ते खाली उतरले. यावेळी पाटील दाम्पत्याला डोंगर सर करण्याचा मोह झाला. पांडवलेण्याच्या पाठीमागील भागातील डोंगर त्यांनी चढण्यास सुरूवात केली; मात्र डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यानंतर जमिनीच्या दिशेने पुन्हा जाण्याचा मार्ग धुसर दिसू लागल्याने त्यांची पाचावर धारण बसली. डोळे गरगरू लागल्याने चक्कर जाणवण्यास सुरूवात झाली. दरम्यान, पोलीस नियचढून गेले परंतु उतरण्यास त्यांना मार्ग सापडला नाही अखेर त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांचे नातेवाईक असलेले पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित पोलीस अधिकारी बोरसे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पालीस निरिक्षक संजय सांगळे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळविली. सांगळे यांनी तत्परतेने पोलीस नियंत्रण कक्षाला ‘कॉल’ दिला. पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष, सिडको अग्निशमन उपकें द्राला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले. तसेच इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विकास लोंढे, भगवान शिंदे, रमेश टोपले, रियाज शेख घटनास्थळी पोहचले.

टॅग्स :Trekkingट्रेकिंगNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलPandav cavesपांडवलेणी