शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:17 IST

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देकोरोना : गावांच्या यात्रा रद्द; कोट्यवधींचा फटका

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रांची गजबज असते तसेच ग्रामीण भागांमध्ये शेतकरीवर्गही कामे उरकून सामाजिक व धार्मिक कामांमध्ये सहभाग घेत असतो; पण सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ठिकठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.या कोरोना व्हायरसचा फटका तमाशा कलावंत व फडमालकाला बसत असून, उपासमारीची वेळ आली आहे.लोकनाट्य तमाशा ही जिवंत कला आजही तग धरून आहे. ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे, मात्र व्याजाच्या पैशाने कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा स्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांचे फार मोठे नुकसान झाले असून, काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दसºयापासून ते गुढीपाडव्यापर्यंत तिकिटावर खेळ चालतो; पण आता सध्याच्या दीड महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सीझन असतो. त्यामुळे उचललेले कर्ज कसे फेडायचे, तेव्हा शासनाने तात्काळ मदत घ्यावी नाहीतर पुढील वर्षी तमाशा फड उभे राहणार नाही.-मोहित नारायणगावकर, संचालक, विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ

टॅग्स :Nashikनाशिकnarayangaonनारायणगाव