शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नैवेद्याने भागविली गोरगरिबांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:31 IST

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या श्लोकानुसार होळीपासून शीळ सप्तमीपर्यंत श्री शितळादेवीला नैवेद्य दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्याची नासाडी होऊ नये म्हणून सुशील व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व नैवेद्य गोळा करून गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न असलेल्या नैवेद्याचे वाटप केले.

नाशिकरोड : ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या श्लोकानुसार होळीपासून शीळ सप्तमीपर्यंत श्री शितळादेवीला नैवेद्य दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्याची नासाडी होऊ नये म्हणून सुशील व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व नैवेद्य गोळा करून गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न असलेल्या नैवेद्याचे वाटप केले.राजस्थानी, मारवाडी आदी समाजात होळीच्या दुसऱ्या दिवसापासून शीळ सप्तमीनिमित्त देवी मंदिरातील श्री शितळादेवी मंदिरात पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला जातो. मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही महिला भाविक शीळ सप्तमीच्या अगोदरच नैवेद्य दाखवितात.नाशिकरोडची ग्रामदेवता असलेल्या श्री दुर्गादेवी मंदिरातील श्री शीतलादेवी मंदिरात नैवेद्य चढवितात. देवाला चढविलेले नैवेद्य हे अन्नच असून ते वाया जाऊ नये, नासाडी होऊ नये याबाबत उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी म.सा. यांनी प्रवचनात तो नैवेद्य गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले होते.याकरिता बहुराणी मंडळाच्या महिलांनी नैवेद्य जमा करून दररोज जमा होणारे नैवेद्य दुर्गा उद्यानाबाहेरील भिकारी, तक्षशीला विद्यालय, जयभवानीरोड येथील अनाथाश्रम आदी ठिकाणच्या गरजू, गोरगरिबांना तो नैवेद्य वाटून त्यांच्या पोटाची भूक भागवित होते. दोन्ही बहुराणी मंडळांकडून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.बहुराणी मंडळाच्या महिलांनी पुढाकार घेत नैवेद्य अन्नच आहे हे लक्षात घेऊन गेल्या सात दिवसांपासून गोरगरिबांची अन्नाची भूक भागविली आहे. याकरिता स्नेहल तोडरवाल, वर्षा चोरडिया, रक्षा शहा, हर्षा दुधेडिया, सोनल संकलेचा, स्नेहल खिवंसरा, प्रियंका भंडारी, तृप्ती ललवाणी, सारिका नहाटा, तृप्ती बोरा, वैशाली संचेती, प्रिया धाडीवाल, मानसी धाडीवाल, सायली कटारिया आदी बहुराणी मंडळाच्या महिलांनी सहकार्य केले आहे.अंधश्रद्धेला दूर सारून...देवी-देवतांना केलेला नैवेद्य, नवस फेडताना आदी प्रकारे अन्न मोठ्या प्रमाणात वाया जाऊन त्याची नासाडी होते. तर दुसरीकडे गोरगरीब, भिकारी, गरजू अन्नाअभावी भुकेने व्याकूळ होऊन तडफडतात. देवतांचा नैवेद्य असला तरी ते अन्न आहे व नैवेद्य-अन्नाची नासाडी होऊ नये गरजूंच्या पोटाचा आधार व्हावा याबाबत प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर ‘बहुराणी’ यांनी पुढाकार घेत अंधश्रद्धेला दूर सारून नैवेद्य असलेल्या अन्नाचे गरजूंना वाटप केले.अन्नाची नासाडी टळलीप्रवीणऋषीजी म.सा. यांनी केलेले मार्गदर्शन व दाखविलेला रस्ता लक्षात घेऊन सुशील बहुराणी मंडळ व उज्ज्वल मुक्ती बहुराणी मंडळाच्या महिलांनी पुढाकार घेत गेल्या सात दिवसांपासून दररोज पहाटे ५ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत श्री दुर्गादेवी मंदिरात श्री शितला देवी मंदिरात पूजा करून नैवेद्य दाखविण्यास आलेल्या महिलांकडून नैवेद्य दाखविल्यानंतर संपूर्ण नैवेद्य गोळा करून घेत होते. याकरिता बहुराणी मंडळाच्या महिलांनी नैवेद्य दाखविण्यास आलेल्या महिला भाविकांची नैवेद्याची होणारी नासाडी याबाबत प्रबोधन करून पहाटेपासून दुपारपर्यंत नैवेद्य जमा करीत होते.

टॅग्स :Nashikनाशिक