शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना प्रणित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो तरुण नाशिकमध्ये शिरोडकर यांच्या उपस्थितीत ‘मनविसे’त दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 17:02 IST

सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मनविसेमध्ये प्रवेश केला असून यामध्ये काही युवा सेनेचे कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामिण भागात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. कोणाच्याही विश्वासाला मनविसेमध्ये तडा जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देशेकडो नवीन विद्यार्थ्यांनी शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेमध्ये प्रवेश केला. नवीन-जुना असा कुठलाही भेदभाव संघटनेत चालत नाही

नाशिक : मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयावर रविवारी (दि.२६) शिवसेनेच्या युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांसह शेकडो नवीन विद्यार्थ्यांनी शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिरोडकर यांनी नवीन कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सांगितले. राज ठाकरे यांचे नेतृत्व सर्वांना समान संधी देणारे आहे. त्यामुळे नवीन-जुना असा कुठलाही भेदभाव संघटनेत चालत नाही. जो प्रामाणिकपणे काम करुन संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवतो त्याला नक्कीच जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी मनामध्ये न्युनगंड न बाळगता मनसेच्या बळकटीसाठी प्रयत्नशील रहावे, असे शिरोडकर यावेळी म्हणाले. सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मनविसेमध्ये प्रवेश केला असून यामध्ये काही युवा सेनेचे कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामिण भागात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. कोणाच्याही विश्वासाला मनविसेमध्ये तडा जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, महिनाभरानंतर प्रत्येक नवीन कार्यकर्त्याशी चर्चा करुन सामाजिक कार्याचा आढावा घेत नवीन पदे व जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे शिरोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी व्यासपीठावर मनविसेचे राज्यउपाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, संदीप भवर, दिपक चव्हाण, सागर देवरे, मनोज रामराजे आदि पदाधिकारी उपस्थित होते.महाविद्यालयीन निवडणूका घ्याव्यामहाविद्यालयीन वयात राजकिय नेतृत्वगुण विकसीत होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणूका महत्त्वाच्या ठरतात. या निवडणूका घेतल्या जाव्या यासाठी मनविसेची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे; मात्र निवडणूकांचा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर आखताना आचारसंहिता कडक असणे देखील तितकेच गरजेचे असल्याचे शिरोडकर म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNashikनाशिक