शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील शेकडो प्री-प्रायमरी स्कूल बेकायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:53 IST

शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत आहे आणि दुसरीकडे मात्र सहाव्या वर्षी मुलाला शाळेत प्रवेश देण्यासही सांगत असल्याने यासंदर्भातील संभ्रम वाढला आहे.

ठळक मुद्देलाखोंची देणगी : कारवाई करण्यासाठी महापालिकेचे शिक्षण खात्याला पत्र

नाशिक : शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत आहे आणि दुसरीकडे मात्र सहाव्या वर्षी मुलाला शाळेत प्रवेश देण्यासही सांगत असल्याने यासंदर्भातील संभ्रम वाढला आहे.नाशिक महपाालिकेच्या शिक्षण समितीने अशाप्रकारच्या प्री प्रायमरी शाळांवर आक्षेप घेतला असून यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याकडे तक्रार करून कारवाई करण्यासाठी पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात नर्सरी, केजी, सिनियर केजी अशा वर्गांचे पेव फुटले असून लहान मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी तसेच मुलभूत शिक्षण समजावे यासाठी पालक देखील अशा वर्गात तीन ते साडे तीन वर्षांच्या मुलांना पाठवतात. मुलांना त्यातून शिक्षण मिळते आणि भोवतालच्या परीसराची ओळख होते अशा अनेक जमेच्या बाजु असल्या तरी शिक्षण हक्क कायद्यात पूर्व प्राथमिक किंवा प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नाही. सहाव्या वर्षी मुलाला पहिलीत प्रवेश द्यायचा असल्याने गोंधळ निर्माण होतो. तथापि, प्री-प्रायमरीसाठी शिक्षण संस्थाच पुढाकार घेत आहेत. मुलांची संख्या, अध्यापन पद्धती आणि शुल्क याबाबत कोणत्याही प्रकारे शासनाचे नियंत्रण नसल्याने अनेकदा अशा वर्गांच्या तक्रारींबाबत शिक्षणाधिकारीदेखील हतबल असतात.महापालिका शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्या. त्याचप्रमाणे एकीकडे हे वर्गच बेकायदेशीर असेल तर आरटीई अंतर्गत राखीव प्रवेश देण्यासाठी मोठ्या शिक्षण संस्थांच्या प्री-प्रायमरीत प्रवेश कसा दिला जातो असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्री-प्रायमरी स्कूलवर कारवाई करावी असा ठराव करण्यात आला असून तोच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविण्यत येईल असे शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्र