शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हरित भविष्यासाठी नाशिक देवराईमध्ये एकत्र आले शेकडो हात

By अझहर शेख | Updated: June 5, 2023 19:51 IST

काही तासांत १६०० रोपांची लागवड

अझहर शेख, नाशिक: सातपूरजवळील पश्चिम वनविभागाच्या वनजमिनीवर उदयास आलेल्या ‘नाशिक देवराई’मध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, वैद्यकीय संस्थांच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड केली. आपलं पर्यावरण संस्थेकडून यावर्षी या वनात ४५ प्रजातीच्या आंब्यांच्या सुमारे दीड हजार रोपांची लागवड करण्याचा उपक्रम सोमवारी (दि. ५) घेण्यात आला. यावेळी आबालवृद्धांचे शेकडो हात हरित भविष्यासाठी एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोमवारी सकाळपासूनच विविध शाळा, महाविद्यालयांसह खासगी संस्थांच्या लोकांनी देवराई गाठण्यास सुरुवात केली. वृक्षारोपणासाठी आलेल्या नागरिकांपैकी बहुसंख्य लोकांनी सोबत झाडांना टाकण्यासाठी पाणीदेखील आणले होते. देवराईमध्ये आमराई साकारण्याचा आपलं पर्यावरण संस्थेने संकल्प सोडला आहे.

पहिल्या टप्प्यात शेंदऱ्या, कुईरी, कवट्या, गोटी, लोणचा, शेप्या, ब्रह्मपुरी यांसारख्या बारा आंब्याच्या प्रजातींची १६० झाडे लावण्यात आली. याव्यतिरिक्त वरस, पायर, गोंदण, भिरा, कुसुम, करपा, मोई, जंगली अजान, खटखटी, पाडळ, कुंकू, खडकपायर, तुतु, निमई यासारख्या देशी प्रजातीच्या रोपांचीही आलेल्या लोकांनी लागवड केली. दिवसभरात याठिकाणी एकूण १ हजार ६६० रोपांची लागवड पूर्ण करण्यात आल्याची माहिती संस्थेचे शेखर गायकवाड यांनी दिली. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून या वनात खड्डे खोदून त्यात पाण्याचा ओलावा देत खत टाकून खड्डे वृक्षारोपणासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. वृक्षप्रेमी आबालवृद्धांना रोपे पुरवून लोकसहभागातून लागवड करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दिनकर पाटील, तानाजी जायभावे, वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरण