शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो दिंड्या त्र्यंबकनगरीत विसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:05 IST

निवृत्तीनाथ यात्रा : भगव्या पताकांनी शहर सजले

ठळक मुद्देआळंदी,सासवड ,मुक्ताईनगर, बेलापुर आदी मानाच्या दिंडया देखील आपल्या फडावर स्थिरावल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर :सकळही तिर्थे निवृत्तीचे पायी।तेथे बुडी देई माझ्या मना॥मुखी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा नामजप करत टाळ-मृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर शहरात शेकडो दिंड्या दाखल होत असून यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला आहे. दिंड्या-भगव्या पताकांनी त्र्यंबकनगरी सजली आहे. एकादशीला (दि.३१) पहाटे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांच्या गर्दीला उधाण येणार आहे.संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने महिनाभरापासून जीवघेणी थंडी, दिवसा उन अशा परिस्थितीत संजीवन समाधी स्थळाचे दर्शन घेण्याच्या ओढीने पायी दिंडी सोहळ्यात दाखल होऊन यंबकेश्वरची वाट तुडवत येणा-या वारकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे. शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे कुशावर्त परिसरात भाविकांच्या गर्दीला उधाण आले आहे. त्र्यंबक नगरपरिषद व श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने हार फुले तर गजानन महाराज संस्थान तर्फे उपरणे देऊन दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिंडी कुठुन आली, दिंडीत किती वारकरी आहेत, महिला पुरु ष याबाबतची माहिती संकलित केली जात आहे. साधारण तळेगाव पासुन ते या चारही दिशेला असलेल्या अंबोली, पहिने या गावांमधील नेहमीच्या फडावर दशमीच्या कीर्तनाचा गावकरी लाभ घेत आहेत. आळंदी,सासवड ,मुक्ताईनगर, बेलापुर आदी मानाच्या दिंडया देखील आपल्या फडावर स्थिरावल्या आहेत. दशमी, एकादशी आणि द्वादशी अशी तीन दिवस यात्रा भरते. दरम्यान त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने फुलली असुन सर्व प्रकारचे दुकाने, स्टॉल्स लागले आहेत.गावाबाहेरील पटांगणात तमाशांचेही फड उभे राहिले आहेत. परिसरातील खेड्यांमधील आदिवासी बांधवांना देखील सुगीचे दिवस आले असून त्र्यंबकेश्वर यात्रेमध्ये कोट्यावधी रु पयांची उलाढाल होत आहे.शासकीय महापूजासंत निवृत्तीनाथांच्या शासकीय महापुजेसाठी दरवर्षी मंत्री महोदयांना निमंत्रित करण्याची परंपरा आहे. यावर्षी देखील जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांची शासकीय महापुजा पहाटे होणार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक