शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
2
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
3
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
4
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
5
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
6
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
7
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
8
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
9
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
10
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
11
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
12
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
13
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
14
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
15
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
16
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
17
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
18
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
19
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
20
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स

शेकडो नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचा वाजविला बोजवारा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 3:32 PM

खेडलेझुंगे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.

ठळक मुद्देखेडेलझुंगेत कोरोना बाधीत रु ग्ण : रु ई येथे भरला आठवडे बाजार

खेडलेझुंगे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहेत.निफाड तालुक्यातील रु ई येथे शनिवारी आठवडे बाजार भरविण्यात येत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाबाजारबंद करण्यात आलेला होता. परंतु शनिवारी(दि.२०) रु ई येथे नेहमीच्या जागेवरच भरविण्यात आला, त्यामुळे लगेच खरेदी करतांना शेकडो नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केलेली होती. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घ्यावयाची काळजी कोणत्याही नागरीकांकडुन घेतांना आढळुन आले नाही. तोंडाला मास्क किंवा रु माल न बांधता नागरीक मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे दिसून येत आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन, पदाधिकारी व संबंधित पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जागरूक नागरिकांनी यावर रोष व्यक्त केला आहे.रु ई येथे अचानक शनिवारी बाजार भरविला गेला कसा हा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. कोरोना कालावधीत सदरचा बाजार पाटाच्या किनारी भरविण्यात येत होता. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होतांना दिसुन येत नव्हते असे अनेकांनी सांगितले. निफाड तालुक्यात सुमारे २१ गावांमध्ये ५१ कारोनारु ग्ण आढळुन आलेले आहेत. त्यापैकी ४ रु ग्णांचा मृत्यही झालेला आहे. याची सर्व ग्रामीण भागात माहीती असुनही येथे बाजार भरविण्यातआल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजीपाला, किराणा, औषधी आदी वस्तू जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना खरेदी करणे आवश्यक आहे, मात्र वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिक घराबाहेर न पडता दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. रु ईपासुन अवघ्या ६ किमी अंरावरील खेडलेझुंगे येथे श्निवारी (दि.२०) एका ७५ वर्षीय इसम कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आलेला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यात रु ई येथे भरलेल्या बाजारामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.(फोटो २१ रुई,१,२)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBaazaarबाजार